मुंबई - महाराष्ट्र सेवा संघ मुलुंडतर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी मुलुंड पूर्व परिसरात पारंपरिक दिंडी काढण्यात आली. पंढरपूरच्या दिंडीप्रमाणे काढण्यात आलेल्या या दिंडीने मुलुंडकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
टाळ मृदंगाच्या नादात तल्लीन होत मुलुंडवासियांकडून हिंदू नववर्षाचे स्वागत; महाराष्ट्र सेवा संघाचा उपक्रम - मराठी बातम्या
महाराष्ट्र सेवा संघ मुलुंडतर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी मुलुंड पूर्व परिसरात पारंपरिक दिंडी काढण्यात आली होती.
![टाळ मृदंगाच्या नादात तल्लीन होत मुलुंडवासियांकडून हिंदू नववर्षाचे स्वागत; महाराष्ट्र सेवा संघाचा उपक्रम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2931596-thumbnail-3x2-mulund-tal-mridung.jpg)
या दिंडीवेळी टाळ मृदंगाच्या गजरात महिला आणि पुरुषांनी तल्लीन होत सहभाग नोंदविला होता. राज्यभरात गुडीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळतो. हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त मुलुंड परिसरात अनेक ठिकाणी शोभायात्रा निघाल्या. यावेळी ठिकठिकाणी महिलांनी रांगोळी काढल्या होत्या तर विविध प्रकारच्या मोटारसायकलवर त्या स्वार झालेल्या पाहायला मिळाल्या.
ढोल ताशा आणि लेझीमच्या तालावर लहान मुले तसेच महिला आणि पुरुषांनी नृत्य सादर केले. यावेळी काही महिला पुरुष देशातील दहशतवादाच्या घटनांविरोधात एकत्र आले पाहिजे, असे फलक हातात घेऊन शोभायात्रेत सहभागी झाले होते. दुसरीकडे लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा करुन आपला सहभाग नोंदविला होता.