मुंबई - कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनची अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस दल दिवस-रात्र काम करत आहे. या दरम्यान पोलिसांना कोरोनाने विळखा घातला असून हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात 1 हजार 206 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 125 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 89 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 283 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 34 पोलीस अधिकारी व 249 पोलीस कर्मचारी आहेत. अजूनही 912 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 90 पोलीस अधिकारी व 822 पोलीस कर्मचारी आहेत.