मुंबई- राज्यात लॉकडाऊननंतर बिगिन अगेनला सुरुवात झाली आहे.. त्या अंतर्गत राज्य सरकारने गुरुवारी राज्यातील सलून ब्युटी पार्लर उघडण्याची मुभा दिली आहे.. तर गुरुवारी राज्यात ३ हजार ६६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत बरे होणाऱ्यांची एकूण संख्या ७७ हजार ४५३ झाली आहे.. देशपातळीवर गुरुवारी १७ हजार नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.. यासारख्या राज्य देशपातळीवरील इतर घडामोडींचा धावता आढावा घेतला आहे.. ईटीव्ही भारतच्या टॉपटेन न्यूज मधून...
हैदराबाद- कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरात गुरुवारी 17 हजार नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 418 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 73 हजार 105 वर पोहोचली आहे. केंद्रिय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 14 हजार 894 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
वाचा सविस्तर -देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी... वाचा एका क्लिकवर
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याप्रमाणे शासनाने आज 'मिशन बिगिन अगेन'च्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात केशकर्तनालये, सलून्स आणि ब्युटी पार्लर्स २८ जूनपासून सुरू करता येतील.
वाचा सविस्तर - राज्यात सलून, केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी
मुंबई - देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात गुरुवारी ३ हजार ६६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत बरे होणाऱ्यांची एकूण संख्या ७७ हजार ४५३ झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.४२ टक्के इतके झाले आहे. यासोबतच गुरुवारी राज्यात ४ हजार ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले. सध्या राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर (अॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
वाचा सविस्तर -महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात गुरुवारी 3 हजार 661 बाधितांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर 52.42 टक्के
मुंबई- मुंबईमधून गुरुवारी एकाच दिवशी 2 हजार 141 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आतापार्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 39 हजार 151 वर पोहचली आहे. तर गुरुवारी नवीन 1 हजार 365 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 98 जणांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 70 हजार 990 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 4 हजार 60 वर पोहचला आहे.
वाचा सविस्तर-मुंबईत गुरुवारी 2141 रुग्णांची एकाच दिवशी कोरोनावर मात; तर 1365 नवीन रुग्ण आढळले
पाटना -उत्तर भारतामध्ये आज(गुरुवार) ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने तब्बल 83 जणांचा जीव गेला आहे. तर उत्तरप्रदेश राज्यात 25 जण दगावले आहेत. बिहारमधील गोपालगंज या एकाच जिल्ह्यात 13 जण वज्रघाताचे शिकार झाले आहेत. देशावर कोरोना संकट असतानाच नैसर्गिक संकटानेही उत्तर भारतावर शोककळा पसरली आहे.