महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 28, 2021, 7:21 AM IST

Updated : Jul 28, 2021, 1:17 PM IST

ETV Bharat / state

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या..

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Top 10 @ 1 PM
Top 10 @ 1 PM

  1. बंगळुरू - भाजप सरकारने दोन वर्षे कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी खांदेपालट केला आहे. मुख्यमंत्रिपदाचा बी. एस. येडियुराप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कर्नाटकचे भाजप प्रभारी अर्जुन सिंह यांनी मंगळवारी सांयकाळी नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार बसवराज बोम्माई यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे. सविस्तर वृत्त -
  2. सातारा - उंच डोंगर, खोल दऱ्या, हिरवागार परिसर आणि रपरपणारा पाऊस यासाठी मान्यता पावलेल्या मिनी काश्मीर महाबळेश्वरने यंदा सव्वाशे वर्षांतला विक्रमी पाऊस अनुभवला. २२ व २३ जुलै या दोन दिवसात तब्बल १ हजार ७४.०४ मिलिमिटर पावसाची नोंद झाली.सविस्तर वृत्त -
  3. मुंबई -राज्य सरकारने पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या उच्च न्यायालयातील जामिनाला विरोध केला आहे. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच कारवाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्ही याप्रकरणी सर्व कागदपत्र न्यायालयात सादर करू, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. 'आम्ही काही पीडितांचा जबाबही नोंदवला आहे', असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. तर याप्रकरणी एकतर्फी निकाल देऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारला राज कुंद्राच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर याप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी 29 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त -
  4. मुंबई -काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हा सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांना बसला होता. मात्र, अजूनही राज्यावर पावसाचा धोका टळलेला नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता आणखी वाढणार आहे. पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणाच्या किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किमी प्रती तास राहण्याची शक्यता आहे. सविस्तर वृत्त-
  5. नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरू झाले असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. आज अधिवेशनाचा सातवा दिवस आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि 9 विरोधी पक्ष नेते लोकसभेत पेगासस मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव मांडणार आहेत. मंगळवारी काँग्रेस संसदीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सविस्तर वृत्त -
  6. मुंबई - एकदा कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होणार नाही असा काहींचा समज आहे. मात्र, मुंबईत असा एक प्रकार घडला आहे जे वाचून धक्काच बसेल. मुंबईतील एका डॉक्टरला कोरोनाचा तीन वेळा संसर्ग झाला आहे. धक्कादायक म्हणजे, दोनदा झालेला संसर्ग हा कोरोनाची लस घेतल्यानंतरही झाला आहे. डॉ. सृष्टी हलारी असे या डॉक्टरचे नाव असून, त्या 26 वर्षाच्या आहेत. सविस्तर वृत्त -
  7. लखनऊ -उत्तर प्रदेशच्या बाराबांकी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. वेगाने येणाऱ्या ट्रक्टरने एका बसला जोरदार धडक दिली. यात 18 लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 15 लोक गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सविस्तर वृत्त -
  8. मुंबई - राष्ट्रीय प्रशिक्षकाचा सल्ला न ऐकण्याचा प्रकार भारतीय महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिला चांगलाच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. मनिकावर शिस्तभंगाचा ठपका ठेवत भारतीय टेबल टेनिस संघाकडून कठोर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. सविस्तर वृत्त -
  9. मुंबई - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘शांतीदूत’ प्रतिमेवरून राज्यपालांनी केलेल्या विधानाचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. राज्यपालांवर संघाचे संस्कार झाल्याने त्यांना पदाचा विसर पडला आहे. राजकारणाची खुमखुमी असलेल्या राज्यपालांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत केली. सविस्तर वृत्त -
  10. मुंबई -उद्योगपती राज कुंद्राच्या कंपनीच्या तीन-चार निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एक नाव अभिनेत्री वशिष्ट हिचे देखील आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपासादरम्यान, आता आरोपींमध्ये गहनाचे नाव समोर आले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने पोर्नोग्राफी प्रकरणाची सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली आहे.सविस्तर वृत्त -
Last Updated : Jul 28, 2021, 1:17 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details