- मुंबई - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करणारी महिला रेणू शर्मा हिच्या विरोधात भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनीसुद्धा तक्रार दाखल केली आहे. 2010 पासून सदरची महिला आपल्याला व्हॉट्सअॅपवरून सतत मेसेज करून संपर्क साधून मैत्री करण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांना रेणू शर्माने ट्विटरवरून उत्तर दिले आहे.
सविस्तर वाचा -रेणू शर्माचा कृष्णा हेगडेंवर पलटवार, म्हणाली हा तर प्रतिमा मलिन करण्याचा डाव
- मुंबई -सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपाची संपूर्ण माहिती राष्ट्रवादीच्या कोर कमिटीने घेतली. त्यानंतर मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचा निर्णय कमिटीने घेतल्याचे सुत्रांकडून समजत आहे. रात्री उशिरा मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सविस्तर वाचा -तुर्तास दिलासा! धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत निर्णय
- नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाकडून देशभरात राजभवन घेराव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यपाल निवासस्थानाला काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आज घेराव घालणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी दिल्लीतून या आंदोलनाची सुरूवात करणार आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत ऐकी दाखवण्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. किसान अधिकार दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने हे आंदोलन उभारले आहे.
सविस्तर वाचा -काँग्रेसचे देशभरात 'राजभवन' घेराव आंदोलन, राहुल गांधी दिल्लीतून करणार सुरुवात
- कर्नाटक -धारवाडच्या इट्टीगट्टी गावाच्या हद्दीत एका डंपरने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिल्याने ११ जण ठार झाले आहे. तर, या भीषण अपघातात ९ जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग चारवर हा अपघात घडला. प्रवाशांना घेऊन टेम्पो ट्रॅव्हलर दावणगिरीहून बेळगाव येथे निघाला होता.
सविस्तर वाचा -कर्नाटकमध्ये डंपर-टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात, ११ ठार
- जळगाव -ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जामनेर तालुक्यात चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर हा प्रकार घडला आहे. देवपिंप्री येथे चाकू हल्ला करुन पिस्तुल रोखून धमकावण्यात आले होते. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
सविस्तर वाचा -जामनेरात निवडणुकीच्या वादातून चाकू हल्ला; पिस्तुल रोखून धमकावले
- पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल पद गमावलेले एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीचे समन्स पाठवण्यात आले आहे. त्यांना भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये जमीन व्यवहारा संदर्भात हे समन्स बजावले आहे. एकनाथ खडसे यांची शुक्रवारी ईडी चौकशी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी शुक्रवारी हजर होणार आहेत. पुण्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये खडसे यांची चौकशी होणार आहे.