- अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे येत्या ३० जानेवारी पासून आपल्या कृषी मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. अण्णांनी हे आंदोलन करू नये यासाठी भाजपाचे नेते प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने आज (गुरुवारी) सकाळीच माजी मंत्री आणि भाजप सरकार मधील संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी मध्ये अण्णांची भेट घेत केंद्र सरकारने नव्याने दिलेला प्रस्ताव अण्णांसमोर सादर केला.
सविस्तर वाचा -अण्णांच्या मागण्यांसाठी उच्चाधिकार समिती; आंदोलन होणार नाही, महाजनांना विश्वास
- मुंबई -सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या पत्नी स्वप्नाली भोसले यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स मिळाल्याची माहिती समोर येत आहे. स्वप्नाली या विश्वजीत कदम यांच्या पत्नी व पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची कन्या आहेत.
सविस्तर वाचा -सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या पत्नीला ईडीचे समन्स
- पुणे -पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. आंबेडकर नगर भागात 50 ते 60 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड करत पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यात आले आहेत.
सविस्तर वाचा -पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात 50 ते 60 वाहनांची तोडफोड
- 26 जानेवारीला (मंगळवारी) शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या रॅलीला हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर कब्जा मिळवत निशाण साहीब ध्वज फडकावला. लाल किल्ल्यावर पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाली. सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसानही झाले. या घटनेनंतर ईटीव्ही भारतने लाल किल्ल्यावरून सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे.
सविस्तर वाचा -ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर लाल किल्ल्यावरून सद्यस्थितीचा आढावा
- मुंबई -रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांची पक्षाच्या वेबसाईटवरच चुकीची ओळख असल्याचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून कारवाईचा इशारा दिला आहे.अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपाने हे कृत्य करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल करावाई करेल, असेही देशमुख म्हटले आहेत.
सविस्तर वाचा -भाजपा खासदारांच्या यादीत रक्षा खडसे यांचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्रालयाने दिला कारवाईचा इशारा
- चिककोडी (बेळगाव ) -बेळगाव, कारवार आणि निपाणीनंतर आता कर्नाटकाने मुंबईवर देखील आपला दावा केला आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई आमचीच असल्याचे सांगितले आहे.
सविस्तर वाचा -बेळगाव, कारवारनंतर मुंबईवरही कर्नाटकचा दावा, उपमुख्यमंत्री म्हणाले, 'मुंबई आमचीच'
- चित्रदुर्ग - सेंद्रीय शेती फुलवण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका तरुणीने आयटी कंपनीतील चांगल्या जॉबला रामराम ठोकला. अभियांत्रिकेचे शिक्षण झालेल्या रोजा रेड्डी या तरुणीने शेती आणि आयटी शिक्षणाचा मेळ घालत यशस्वीरित्या सेंद्रीय शेती सुरू केली आहे. आता रोजा रेड्डी दिवसाला १० हजार रुपये कमवत असून तिने तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
सविस्तर वाचा -सेंद्रीय शेती करण्यासाठी सोडला आयटीतला जॉब, आता दिवसाला कमावतेय १० हजार
- मुंबई-दिल्लीच्या रस्त्यावर जी दंडुकेशाही झाली त्याची जबाबदारी फक्त शेतकरी आंदोलकांवर टाकून चालणार नाही. जे सरकारला हवे होते तेच घडवून आणण्यात आले. त्यात बळी गेले ते शेतकऱ्यांचे आणि रक्त सांडले ते पोलीस व जवानांचे, असा थेट हल्ला शिवसेनेने केंद्र सरकारवर केला आहे. २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारा बाबत आजच्या सामनामधून भाष्य करण्यात आले आहे. कायदा हाती घेणाऱ्यांची गय कोणत्याच सरकारने करू नये, पण साठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवून वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही? तीन कृषी कायदे म्हणजे देशाचे वर्तमान आणि भविष्य नाही. कुणाचे तरी हित त्यात गुंतले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर दमनचक्र सुरू आहे! हे देशहिताचे नाही, असा सल्लाही सामानाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
सविस्तर वाचा -जे सरकारला हवे होते तेच घडवून आणण्यात आले; त्यात बळी गेले ते शेतकऱ्यांचे आणि रक्त सांडले ते जवानांचे
- नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागल्याने शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले आहे. यानंतर दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघारी घेतली असून १ फेब्रुवारीला संसदेवर काढण्यात येणारा मोर्चाही रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करण्याच्या दिवशी शेतकरी मोर्चा काढणार होते. मात्र, आता हा नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा -ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर संसदेवर काढण्यात येणारा मोर्चा रद्द
- नांदेड - नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली शासकिय कार्यालय नांदेड येथेच असावीत यासाठी माझा कायम आग्रह राहिलेला आहे. मागील काही वर्षात निर्माण झालेला अनुशेष पूर्ण करण्याच्यादृष्टिने सर्व विभागाशी समन्वय साधत नांदेडसाठी कोणतेही कमतरता पडणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
सविस्तर वाचा -नांदेड येथे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक आणि कार्यकारी अभियंता विद्युत कार्यालयाची भर