मुंबई :अधिवेशनाचा आज 8वा दिवस आहे. विधिमंडळाच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची आज बैठक होणार आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज कारागृहातून बाहेर येणार आहेत. त्यानिमित्ताने अर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदीर दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे. ( Top News today in marathi )
अधिवेशनाचा आज 8 वा दिवस :( winter session 2022 )अधिवेशनाचा आज 8 वा दिवस आहे. विधिमंडळाच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची आज बैठक होणार असून अधिवेशनाच्या कालावधीचा निर्णय होणे अपेक्षित आहे. आज विविध विषयांवर 11 मोर्चे निघणार आहेत. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम :28 डिसेंबर 1885 साली मुंबईतील तेजपाल सभागृह येथे काँग्रेसची स्थापना झाली होती. आज त्या ऐतिहासिक घटनेला 138 वर्षे पूर्ण होत आहेत. 28 डिसेंबर काँग्रेस स्थापना ( Congress Foundation Day ) दिवस दरवर्षी संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात 'प्रेरणा दिवस' म्हणून साजरा केला जातो. आज काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा सत्कार होणार आहे. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे, श्री के सी वेणू गोपाल, एच के पाटील, इम्रान प्रतापगढी, कन्हैय्या कुमार, भाई जगताप, नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, चरणसिंग सप्रा यांच्यासह आदी नेते उपस्थित रहाणार आहेत. दुपारी 3.30 वाजता, सोमय्या मैदान, सायन येथे हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित चहा पानाच्या कार्यक्रमास शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
संभाजी ब्रिगेडचे रौप्य महोत्सवी अधिवेशन : आज संभाजी ब्रिगेडचे रौप्य महोत्सवी अधिवेशन आहे. सकाळी 10 वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन तर संध्याकाळी 5.30 वाजता शरद पवार यांच्या हस्ते समारोप. (Silver Jubilee Session of Sambhaji Brigade )