मुंबई : आज दिवसभरात कोठे, काय होणार? देशभरसह राज्यतील महत्त्वाच्या बातम्यांचा अढावा वाचा ( Read Important Top News Today ) एक क्लिकवर. ( Top News Today )
सुषमा अंधारेंचे एकनाथ शिंदेंना खोचक चिमटे : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना त्यांनी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह बळकावण्याच्या प्रयत्नांवरून एकनाथ शिंदेवर टीकास्र सोडले आहे. यावेळी सुषमा अंधारे एका घटनेचा उल्लेख करत म्हणाल्या, “साधारत: दीड ते दोन महिन्यांपूर्वी एका माणसावर गुन्हा दाखल झाला होता. त्याला अटक झाली होती. ते केवळ एकनाथभाऊंसारखे दिसतात, हाच त्याचा गुन्हा होता. त्याला एकनाथभाऊंसारखी दाडी आहे. मिशा आहे, चष्मा आहे, तो एकनाथ भाऊंसारखा फोटो काढतो, म्हणून त्याच्यावर कारवाई झाली.
श्रद्धा वालकर खून प्रकरण : दिल्लीत वसईतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) या 26 वर्षीय तरुणीची प्रियकराने अतिशय क्रुरतेने हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. श्रद्धा खून प्रकरणात नव नवीन माहिती समोर येत आहे. त्यात आता श्रध्दाच्या वडिलांनी या खूनामागे ‘लव्ह जिहाद’चा शंका व्यक्त केली आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची विदर्भात एंट्री : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची वाजता विदर्भ एन्ट्री झाली आहे. आज सकाळी ६.१५ वाजता वाशीमपासून जवळच असलेल्या जांभरुण परांडे येथील मनिष मंत्री फार्म हाऊस येथून यात्रेला सुरुवात झाली. वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर पदयात्रेचे आगमन होताच अमरावती येथील रामराज्य ढोलताशा पथकातील सदस्यांनी चाळीस ढोल वाजवून यात्रेकरूंमध्ये उत्साह निर्माण केला. कनेरगाव नाका येथे हजारो कार्यकर्ते, कला संच आणि ग्रामस्थांनी यात्रेचे स्वागत केले.
२०२४ पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार येईल - अंधारेंचे : राज्यात २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा दावा खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला होता. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना आमदार बच्चू कडू यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. आज अमरावतीत प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
JioMart च्या सोबतीने लग्नाच्या हंगामासाठी व्हा तयार :भारतात कधीही सेलिब्रेनला ब्रेक लागत नाही. दिवाळी सणाचा आनंद लुटल्यानंतर आता आपण लग्नाच्या हंगामात प्रवेश करत आहोत. दिवाळी डिटॉक्सपासून ते लग्नाची खरेदी, भेटवस्तू देण्यापासून ते हिवाळ्यातील प्रवासाच्या योजनेपर्यंत आम्ही सर्व काही गोष्टींचं तुमच्यासाठी नियोजन करत आहोत. तुम्ही काळजी करु नका, जिओमार्टच्या सोबतीने सर्व काही सहज होईल.
बुलेट ट्रेनच्या १३५ किलोमीटर मार्गाच्या कामांसाठी निविदा :मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून गती दिली जात आहे. वांद्रे कुर्ला संकुल-शिळफाटा या २१ किलोमीटर भुयारी मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात असताना आता शिळफाटा ते झारोळी (महाराष्ट्र-गुजरात सीमा) या ऊर्वरित १३५ किलोमीटरच्या मार्गासाठीही निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन स्थानकांचीही कामे होणार आहेत. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १४ मार्च २०२३ असून निविदा खुली होणार आहे.