मुंबई :आज दिवसभरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार समृद्धी महामार्गाची पाहणी, दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मतदान, राज ठाकरेंचा रत्नागिरी दौरा, छत्रपती संभाजीराजे किल्ले विशाळगडला भेट देणार, उदय सामंतांची पत्रकार परिषद, विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषद या महत्त्वाच्या घडामोडीआहेत.
आजदिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मतदान (Voting for Delhi Municipal Election) : आज दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी दिल्लीत तीन महापालिका होत्या. मात्र आता केंद्र सरकारने तिन्ही महापालिकांची मिळून एक महापालिका केली आहे.
आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार समृद्धी महामार्गाची पाहणी (CM DCMwill inspect Samriddhi Highway today ) : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.
आज राज ठाकरेंचा रत्नागिरी दौरा (Raj Thackeray on Ratnagiri Visit) : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून मान्यवरांच्या भेटीगाठी, रत्नागिरी विधानसभा कार्यालयाचे उद्घाटन, पदाधिकाऱ्यांची बैठक, असे त्यांचे कार्यक्रम आहेत.
आज उदय सामंतांची पत्रकार परिषद (Uday Samantchi press conference) : उद्योग मंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आहेत. दिवसभर विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावतील. दुपारी 12 वाजता उद्योजक बरोबर बैठक आहे. दुपारी दीड वाजता उदय सामंतांची पत्रकार परिषद होणार आहे.
छत्रपती संभाजीराजे किल्ले विशाळगडला भेट देणार (Chhatrapati Sambhaji Raje visit Vishalgarh fort) : छत्रपती संभाजीराजे किल्ले विशाळगडला भेट देऊन सद्यस्थितीची पाहणी करणार आहेत.
आज विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषद (Press conference of Vijayakumar Gavit) : आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 12 वाजता ही परिषद पार पडणार आहे. बोगस आदिवासी प्रकरणावर माजी मंत्री के सी पाडवी यांनी केलेल्या आरोपांना ते उत्तर देणार आहेत.