- नवी दिल्ली - मोदी सरकारने संसदेत मांडलेल्या तीन शेतीविषयक विधेयकांच्या निषेध व्यक्त करत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांचे पती शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी लोकसभेत आज (गुरुवारी) त्यांच्या राजीनाम्याबाबत घोषणा केली.
वाचा सविस्तर -हरसिमरत कौर बादल यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा; एनडीएत फूट?
- मुंबई- पूर्ण आसन क्षमतेने एसटी प्रवास उद्या 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली आहे. त्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे व हात निर्जंतुक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वाचा सविस्तर -उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने एसटी प्रवास सुरू; राज्य सरकारची परवानगी
- मुंबई- राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला असून २४ तासात २४ हजार ६१९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात १९ हजार ५२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३९८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३१ हजार ३५१ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईमध्ये संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे.
वाचा सविस्तर -राज्यात कोरोनाचा उद्रेक; २४ हजार ६१९ नव्या रुग्णांची नोंद, ३९८ मृत्यू
मुंबई -राज्यात मेगा पोलीस भरती करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील साडेबारा हजार पोलिसांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या निर्णयाला मराठा समाजाकडून कडाडून विरोध सुरू झाल्यानंतर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजासाठी १३ टक्के जागा शिल्लक ठेवून इतर जागांवर भरती करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
वाचा सविस्तर -'पोलीस भरती करताना मराठा समाजाला १३ टक्के जागा रिक्त ठेवू'
- मुंबई -सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास) संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केली आहे. मराठा नसलेले मंत्री मराठा समाजाला न्याय देणार नाही या भावनेतून मराठा समाजाने ही मागणी केली होती. त्यांची मागणी मान्य करत राज्य सरकारने अखेर शासनादेश जारी करत नियोजन विभागाकडे ही जबाबदारी दिली.
वाचा सविस्तर -...अखेर मराठा समाजाच्या योजनांची जबाबदारी अजित पवारांकडे
- नवी दिल्ली -देशात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे कोरोना लस कधी येणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिली. पुढील वर्षांच्या सुरुवातील कोरोना लस उपलब्ध असेल, असे त्यांनी सांगितले. संसदेत पावसाळी अधिवेशनादरम्यान ते बोलत होते.
वाचा सविस्तर -'कोरोना लस 2021च्या सुरवातील उपलब्ध असेल'
- औरंगाबाद- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनावरून आता औरंगाबादेत राजकारण रंगताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला ऑनलाइन हजेरी लावली. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली. मी गैरहजर असल्यावर मला देशद्रोही म्हणून घोषित करता, मग मुख्यमंत्री आले नाही तर ते देशभक्त कसे, असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन उपस्थित केला आहे.