नवी दिल्ली- देशामधील सर्व राज्यांमध्ये कोरोना चाचणीच्या दरात समानता ठेवा. त्यासाठी राज्य सरकारांबरोबर मिळून काम करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. अनेक राज्यांमध्ये कोरोना चाचणीची वेगवेगळे दर आहेत. त्यावरून न्यायालयाने हे आदेश दिले...तसेच पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली भागात सोमवारी(15 जून) रात्री भारत आणि चीनच्या सैनिकामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही देशांच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, गुरुवारी चर्चेनंतर चीनने 10 भारतीय जवनांची सुटका केली आहे. यामध्ये चार अधिकाऱ्यांचाही समावेश आहे...यासह महत्वाच्या १० बातम्या..
- नवी दिल्ली - देशामधील सर्व राज्यांमध्ये कोरोना चाचणीच्या दरात समानता ठेवा. त्यासाठी राज्य सरकारांबरोबर मिळून काम करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. अनेक राज्यांमध्ये कोरोना चाचणीची वेगवेगळे दर आहेत. त्यावरून न्यायालयाने हे आदेश दिले.
सविस्तर वाचा-देशभरात कोरोना चाचणीच्या शुल्कात समानता ठेवा, सर्वोच्च न्यायालय
- नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली भागात सोमवारी(15 जून) रात्री भारत आणि चीनच्या सैनिकामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही देशांच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, गुरुवारी चर्चेनंतर चीनने 10 भारतीय जवनांची सुटका केली आहे. यामध्ये चार अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
सविस्तर वाचा -भारत- चीन सीमा वाद: चीनच्या ताब्यातील 10 भारतीय जवानांची सुटका
- संचारबंदीजाहीर झाल्यापासून देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले. या दरम्यान सर्वाधिक फटका कामगार आणि मजूर वर्गाला बसला. रोजंदारीवर घर चालत असल्याचे त्यांची उपासमार सुरू झाली. यानंतर मजूरांनी जमेल त्या मार्गाने घर जवळ करण्यास सुरुवात केली. दरम्याच्या काळात केंद्र सरकारने विविध योजनांसाठी पॅकेज जाहीर केले. यासंबंधी ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. या विशेष मुलाखतीत त्यांनी शेती, कामगार, शेतमजूर, शहरी मजूर तसेच लॉकडाऊन दरम्यान झालेले स्थलांतर यावर प्रकाश टाकला.
सविस्तर वाचा-विशेष मुलाखत : कोरोनावर सरकारचे उपाय म्हणजे पॅकेज नव्हे..निव्वळ 'पॅकेजिंग', पी. साईनाथ यांची टीका
- सोमवारी(14 जून) लडाखच्या पूर्वेला असलेल्या गलवान व्हॅली प्रांतात चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले. यानंतर दोन्ही देशांमधील सीमावाद पुन्हा उफाळून आला. चिनी सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याने वातावरण तापले. यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू झाली. गलवान व्हॅलीमध्ये दोन्ही सैन्यांची झटापट झाली आणि यामध्ये २० भारतीय जवानांना वीरमरण आहे. चिनी सैन्याची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली. याच पार्श्वभूमीवर संरक्षणतज्ज्ञ नितीन गोखले यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. सीमेवर करण्यात आलेली घुसखोरी चीनने जाणूनबुजून केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या वाढत्या महत्त्वाला शह देण्यासाठी ही चीनची रणनीती असल्याचे त्यांनी म्हटले.
सविस्तर वाचा -विशेष मुलाखत : 'चीनची पावलं जाणीवपूर्वक, भारताच्या वाढत्या महत्त्वाला शह देण्याची रणनीती' - नितीन गोखले
- नवी दिल्ली - आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्यांना अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा देण्यास सुरुवात केली आहे. गुरूवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर त्यांना न्यूमोनियाही झाल्याचे समोर आले आहे.