महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या..

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top 10 important news
आजच्या महत्वाच्या बातम्या

By

Published : Jul 29, 2021, 7:20 AM IST

Updated : Jul 29, 2021, 1:12 PM IST

  • वॉशिंगटन-
    राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली होती. तर रायगड, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या. कोल्हापूर, कराड , चिपळूण, रत्नागिरी, सागंली या ठिकाणी महापुराने जनजीवन विस्कळीत झाले. या घटनेनंतर हळूहळू पूर ओसरायला सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. तर आरोग्य यंत्रणेकडूनही खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. आता या दरडग्रस्त आणि पूरग्रस्त भागात अमेरिकेतील एखा समाजसेवी संस्थेकडून आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
    सविस्तर वाचा...
  • मुंबई -
    आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. हे प्रकरण न्यायालयात आहे. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान रश्मी शुक्ला यांची बाजू ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी मांडली. जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितलं की, फोन टॅप करण्याची परवानगी राज्य सरकारनेच दिली होती.
    सविस्तर वाचा...
  • नागपूर -
    शहराच्या लगत असलेल्या हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुखदेव देवाजी वरखडे (३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून सुखदेवचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सुखदेवने आत्महत्या केल्याचा बनाव आरोपींनी केला होता. मात्र, पोलीस तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोन संशयितांची चौकशी सुरू आहे अशी हिंगणा पोलिसांनी माहिती दिली आहे.
    सविस्तर वाचा...
  • हैदराबाद-
    फायझर आणि अॅस्ट्राझेनका लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 6 आठवड्यानंतर शरीरामधील अँटीबॉडीज स्तर कमी व्हायला सुरुवात होते. 10 आठवड्यात 50 टक्के पेक्षा जास्त अँटिबॉडीज कमी होऊ शकतात. द लँसेट मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालामध्ये हा दावा करण्यात आला आहे, की फायझर- अॅस्ट्राझेनकाचे दोन डोस घेतल्यानंतर पेशींची वाढ ज्या गतीने वाढते, 2 ते 3 आठवड्यानंतर तेवढ्याच गतीने त्या घटायला सुरुवात होते. संशोधन अभ्यासमध्ये हे समोर आले आहे, की ही लस कोरोना व्हायरसच्या विरोधात अत्यंत परिणामकारक आहे.
    सविस्तर वाचा...
  • टोकियो -
    भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये बलाढ्य अर्जेंटिनाचा पराभव केला. अर्जेंटिनाचा संघ रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता आहे. अशा बलाढ्य संघाला भारतीय संघाने 3-1 अशा फरकाने धूळ चारली. या विजयासह भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
    सविस्तर वाचा...
  • टोकियो -
    टोकियो ऑलिम्पिकचा आज 7 वा दिवस आहे. आज गोल्फर, बॅडमिंटन, तिरंदाज, बॉक्सर यांच्यासह भारतीय पुरूष हॉकी संघाचा सामना होणार आहे. तर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या राही सरनोबतने 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात शानदार सुरूवात केली. ती पहिल्या सीरीज अखेर 96 गुणांसह टॉप 5 मध्ये राहिली. पण तिसऱ्या सीरीजमध्ये राही पिछाडीवर गेली. ती या सीरीजमध्ये 7 व्या स्थानावर घसरली.
    सविस्तर वाचा...
  • मुंबई -
    पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या अडचणीत भर पडत आहे. राज कुंद्राला अटक केल्यानंतर आता त्याच्या सहकाऱ्यांच्याही मुस्क्या आवळण्याच्या तयारीत मुंबई पोलीस आहेत. त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या 3 निर्मात्यांसह अभिनेत्री गहना वशिष्ठच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.
    सविस्तर वाचा...
  • नवी दिल्ली -
    सेबीने बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा आणि त्याची कंपी विवान इंडस्ट्रीजवर 3 लाखांचा दंड ठोठावला आहे. इनसायडर ट्रेडिंगच्या प्रकरणात हा दंड ठोठावला आहे.
    सविस्तर वाचा...
  • नवी दिल्ली -
    काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने पेगाससची खरेदी केली का, हो किंवा नाही एवढंच उत्तर आम्हाला हवं आहे असे म्हणत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी सर्व विरोधक राहुल गांधींच्या नेतृत्वात सरकारविरोधात एकवटल्याचे चित्र बघायला मिळाले.
    सविस्तर वाचा...
  • नवी दिल्ली -
    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतली. सोनिया गांधींचे दिल्लीतील निवासस्थान 10 जनपथवर जाऊन ममता त्यांना भेटल्या. ममता सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्या विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.
    सविस्तर वाचा...
Last Updated : Jul 29, 2021, 1:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details