महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या..

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या..

top 10 important news
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या..

By

Published : Jul 18, 2021, 8:42 AM IST

Updated : Jul 18, 2021, 1:40 PM IST

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...

  1. मुंबई- शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुंबईच्या अनेक भागात पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे, या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच चेंबूर आणि विक्रोळीमध्ये दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. चेंबूरच्या भारत नगर परिसरामध्ये दरड कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडं विक्रोळी परीसरात एक दुमजली इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही ठिकाणी एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयामध्ये दाखल केला आहेे.
    सविस्तर वाचा...
  2. नागपूर-
    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीचा छापा पडला आहे. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरू केली आहे.
    सविस्तर वाचा...
  3. नाशिक -
    मनसे आणि भाजपाच्या युतीबाबत राजकारणाच्या वर्तुळात चर्चा रंगत असताना रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांनी रविवारी सकाळी एकत्र विश्रामगृह परिसरात मार्निंग वाॅक केला. यावेळी दोघांमध्ये राजकीय चर्चाही झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांमध्ये युती संदर्भातील साखरपेरणी झाली नसेल ना, अशी चर्चा आता रंगली आहे.
    सविस्तर वाचा -
  4. मुंबई -
    काल रात्री 11 ते मध्यरात्री 3 वाजतापर्यंत मुसळधार पाऊस झाला आहे. काल शनिवारी सकाळी 8 ते आज रविवारी सकाळी 8 या 24 तासात मुंबई शहरात 176.96 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 195.48 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 204.07 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर कांदिवली परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.
    सविस्तर वाचा...
  5. पुणे -
    शरद पवार यांचा वरदहस्त असल्यामुळेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. नाशिक महामार्गाच्या बाह्य वळण आणि घाटाच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवाद पाहायला मिळाला. या प्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.
    सविस्तर वाचा...
  6. मुंबई-
    महाराष्ट्र शनिवारी (दि. १७ जुलै) ८ हजार १७५ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून १२४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज ८ हजार ९५० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. गेले काही दिवस मृत्यूदर स्थिर आहे.
    सविस्तर वाचा...
  7. कराड (सातारा) -
    पेट्रोल, डिझेल, गॅस आणि महागाई विरोधात माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये काँग्रेसने सायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल तुम्हे आना है, देश को बचाना है! ही घोषणा देत चैतन्य निर्माण केले. कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून इंधन दरवाढीविरोधातील काँग्रेसच्या या सायकल रॅलीला प्रारंभ झाला.
    सविस्तर वाचा...
  8. पंढरपूर -
    लाखों वारकऱ्यांचा आराध्य दैवत असणार्‍या सावळ्या विठुरायाची आषाढी एकादशी सोहळा २० जुलैला होणार आहे. या एकादशी सोहळ्याची तयारी विठ्ठल मंदिर समितीकडून पूर्ण झाली आहे. यामध्ये मंदिरातील सोळखांबी, सभा मंडप, विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभारा कर्मचाऱ्यांकडून चकाचक करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची तयारी करण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
    सविस्तर वाचा...
  9. चंद्रपूर -
    आपल्या लेकरासाठी आई काय करू शकते, याचे जिवंत उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले. आपल्या चिमुकलीला बिबट्याच्या तावडीत पाहिल्यानंतर, वाघाचे काळीज असलेल्या आईने थेट बिबट्यावरच झडप घेतली. जोवर बिबट्या मुलीला सोडत नाही तोवर तिने बिबट्यावर प्रहार सुरू ठेवला. अखेर बिबट्याला माघार घ्यावी लागली आणि तो जंगलात पळून गेला. मुलीला त्याच्या तावडीतून वाचवूनच या शूर मातेने श्वास घेतला, ही घटना आहे जुनोना गावातील.
    सविस्तर वाचा...
  10. हैदराबाद -
    प्रियंका चोप्रा जोनाससाठी, जेव्हा तिने अमेरिकेत करिअर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रथम तिला गरज होती ती म्हणजे अस्तित्व निर्माण करण्याची. पीसीचा मिस वर्ल्ड ते यशस्वी अभिनेत्री बनण्यापर्यंतचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे. हॉलीवूडमध्ये स्थिरस्थावर होऊन आज तिला सहा वर्ष झाली आहेत. तिने अनेक चित्रपटात कामही केले आणि नंतर काही प्रोजेक्ट्सची निर्मितीही केली. आज तिचा 39 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने प्रियंका निक जोनासच्या करियरचा घेतलेला एक वेध....
    सविस्तर वाचा...
Last Updated : Jul 18, 2021, 1:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details