- मुंबई -महाविकास आघाडी सरकारच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मात्र, अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये दोन आमदारांसह ४० पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
सविस्तर वाचा-आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, विद्यापीठ परीक्षा, कोरोना, दूध प्रश्न पेटणार
- मुंबई - ठाणे, नवी मुंबई परिसरात रात्रभर विजेच्या कडकडाट पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह संपूर्ण उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तापमानही वाढले होते. मात्र किनारपट्टी भागासह पुणे, सतारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पाऊस झाल्याने वातावरणात गारवा पसरलाय.
सविस्तर वाचा-मुंबईसह उपनगरात मुसळधार... विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात
- नवी दिल्ली - स्वच्छ हवा सर्वांचा अधिकार आहे. स्वच्छ हवेअभावी जगभरात दरवर्षी लाखो लोकांचे मृत्यू होता. विविध आजार जडतात. यासंबंधी इशारा देणारे अनेक अहवालही प्रकाशित झाले आहेत. मात्र, पाहिजे तेवढी जनजागृती झालेली नाही. संयुक्त राष्ट्राच्या ७४ व्या आमसभेने डिसेंबर २०१९ मध्ये ७ सप्टेंबर हा 'क्लिन एअर फॉर ब्लू स्काय' जाहीर केला. निळं आकाश, स्वच्छ हवा सर्वांना मिळावी ही भावना यामागे आहे.
सविस्तर वाचा-'निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा'....वायू प्रदुषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन
- अहमदाबाद : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अहमदाबादला 'मिनी पाकिस्तान' म्हणून अहमदाबादचा आणि गुजरातचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी गुजरात भाजपने रविवारी केली.
सविस्तर वाचा-अहमदाबादला 'मिनी पाकिस्तान' म्हटल्याप्रकरणी राऊतांनी माफी मागावी - भाजप
- मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या आपल्या कुटुंबात रमले आहेत. आपल्या नातवंडासोबत वेळ वाया घालवत असताना विजय सुळे या नातूसोबत फेरफटका मारताना त्यांनी विजयच्या हाती गाडीचे स्टेरिंग दिले. विशेष म्हणले नव्यानेच गाडी चालवणाऱ्या आपल्या नातवाला पवारांनी बाजूला बसून ड्रायव्हिंग कशी करावी, यासाठीचे धडेही दिले. यामुळे पवार आपल्या नातवाच्या हाती गाडीसोबतच राजकीय 'स्टेरिंग'ही हाती देण्यासाठीचे धडे देतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सविस्तर वाचा-शरद पवारांचे 'स्टेरिंग' नातवाच्या हाती; सुप्रिया सुळेंनी शेअर केली पोस्ट
- सातारा - बेरोजगार तरुणांना नौदल, आर्मी, ओएनजीसी तसेच बँकेत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तब्बल एक कोटीची फसवणूक करून वर्षभरापूर्वी पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. निलेश महादेव कोकणी व सचिन केपन्ना तरपदार (वय - 34) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.