महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेशोत्सवादरम्यान दादरच्या फुल मार्केटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य - फुल मार्केट कचरा

दादरच्या फुल मार्केटमध्ये विविध प्रकारची शेकडो टन फुले येत असतात. त्यापैकी न विकली गेलेली फुले आणि फुलांचा इतर कचरा मोठ्या प्रमाणावर  बाजारामध्ये जमा होत आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल तीनशे टन फुलांचा कचरा पालिकेने उचलला आहे.

गणेशोत्सवादरम्यान दादरच्या फुल मार्केटमध्ये कचराच कचरा

By

Published : Sep 5, 2019, 3:10 PM IST

मुंबई - दादरच्या फुल मार्केटमध्ये विविध प्रकारची शेकडो टन फुले येत असतात. त्यापैकी न विकली गेलेली फुले आणि फुलांचा इतर कचरा मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये जमा होत आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल तीनशे टन फुलांचा कचरा पालिकेने उचलला आहे, अशी माहिती दादर सफाई कामगार सुपरवायझर अरविंद गोईल यांनी दिली आहे.

गणेशोत्सवादरम्यान दादरच्या फुल मार्केटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य

गणेश उत्सवाचे दिवस आहेत. या दिवसात आपल्या लाडक्या बाप्पासाठी भक्त फुलांची आरास, हार बणवण्यासाठी फुलांची खरेदी करतात.गणेशोत्सव काळात मुंबईतील दादरच्या फुल मार्केट येथे फुले घेण्यासाठी मोठी रेलचेल असते. पावसात भिजल्यामुळे नासडी झाल्यानेही कचऱ्यात वाढ झाल्याचे सफाई कामगार यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details