मुंबई -दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (8 डिसेंबर) रोजी शेतकऱ्यांकडून ‘भारत बंद’चा इशारा देण्यात आला आहे. 'भारत बंद'मध्ये काही व्यापारी संघटना सहभागी होणार नसल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी सांगितले आहे.
निर्णय ऐच्छिक-
एफआरटीडब्ल्यूएने महाराष्ट्रात बंद पुकारलेला नाही. बंद पाळायचा की नाही, हा निर्णय व्यापाऱ्यांनी घ्यायचा आहे. आम्ही यापुढे कोणत्याही व्यवसायाच्या नुकसानाला समर्थन देत नाही, अशी प्रतिक्रिया व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी दिली. नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी या शेतकऱ्यांची आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदला आतापर्यंत अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
नवी मुंबई एपीएमसी बंद -
'भारत बंद'मध्ये नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटही सहभागी होणार आहे. भारत बंदला माथाडी कामगारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आज एपीएमसीमधील भाजी, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट एक दिवस बंद राहणार आहे.
टॅक्सी रिक्षा सुरू -