मुंबई- महापालिका, रुग्णालय प्रशासन अशी कोणाचीही रुग्णालय बंद करण्याची ईच्छा नाही. मात्र, अतिरिक्त घडत असलेल्या गोष्टी आता घडू नयेत याची काळजी घेतली जाईल आणि यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-'ही' सभ्यता नरेंद्र मोदी कधी शिकणार..काँग्रेसची 'त्या' लेखकाविरुद्ध पोलिसांत तक्रार
मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाकडून वाडिया रुग्णालयासाठी दिला जाणारा निधी अनेक वर्षांपासून थकीत आहे. त्यामुळे वाडिया रुग्णालयाचा कारभार ढबघाईस आला आहे. याचा फटका रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना बसत आहे. त्यामुळे रुग्णालय बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, वाडिया रुग्णालयाबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी उद्या महापौरांकडे बैठक होणार असल्याचे सांगितले आहे.