महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतूवरून प्रवास करण्यासाठी मोजावा लागणार 'इतका' टोल

शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतू मार्ग सुरु झाल्यास प्रवास सुपरफास्ट होणार आहे. मात्र या प्रवासासाठी वाहनचालकांना टोल मोजावा लागणार आहे. हा टोल नेमका किती असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असताना एमएमआरडीएने याचे उत्तर दिले आहे.

शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतू
शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतू

By

Published : Dec 5, 2020, 11:02 PM IST

मुंबई - मुंबई ते नाव्हा-शेवा, नवी मुंबई हे अंतर केवळ 25 मिनिटांत पार करणे वाहनचालक-प्रवाशांना सप्टेंबर 2022 पासून शक्य होणार आहे. मात्र हा सुपर फास्ट प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना टोल भरावा लागणार आहे. या टोलची रक्कम 200 रुपये इतकी असणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए)महानगर आयुक्त आर ए राजीव यांनी दिली आहे.

22 किमीच्या सागरी सेतुवरून 25 मिनिटांत नवी मुंबईला -

एमएमआरडीएकडून शिवडी ते नाव्हा-शेवा असा 22 किमीचा सागरी सेतू बांधला जात आहे. अंदाजे 18 हजार कोटीचा हा प्रकल्प असून आतापर्यंत या प्रकल्पाचे सरासरी 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर हा प्रकल्प सप्टेंबर 2022 पर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा प्रकल्प वाहतुकीसाठी खुला झाल्यास एक-दीड तासाच वेळ वाचणार असून शिवडीवरून नाव्हा-शेवा, नवी मुंबईला केवळ 25 मिनिटांत पोहचता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प महत्वाचा मानला जात आहे.

कारसाठी एकेरी 200 रुपये टोल-

शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतू मार्ग सुरु झाल्यास प्रवास सुपरफास्ट होणार आहे. मात्र या प्रवासासाठी वाहनचालकांना टोल मोजावा लागणार आहे. हा टोल नेमका किती असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असताना एमएमआरडीएने याचे उत्तर दिले आहे. या मार्गाचा वापर करण्यासाठी वाहनचालकांना 200 रुपये इतका टोल आकारण्यात येणार आहे. सद्या तरी कारसाठी हा टोल असणार असून हा एकेरी म्हणजेच एका वेळच्या प्रवासासाठी टोल असणार आहे. म्हणजेच येण्या-जाण्यासाठी 400 रुपये मोजावे लागणार आहेत. तर ट्रक आणि इतर वाहनांसाठी किती टोल असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details