- नवी दिल्ली - गतवर्षी जून महिन्यात चिनी सैन्याचा पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सामना करताना भारत मातेचे सुपुत्र कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवानांना वीरमरण आले होते. धारातीर्थी पडण्याआधी चिनी घुसखोरीचा प्रयत्न भातीय जवानांनी हाणून पाडला होता. भारत भूमीच्या रक्षणासाठी जवानांनी दिलेल्या बलिदानाचा प्रजासत्ताक दिनी सन्मान करण्यात आला आहे. कर्नल संतोष बाबू यांनी महावीर चक्र तर इतर पाच जवानांना वीरता चक्र जाहीर करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा -गलवान खोऱ्यातील हुतात्मा कॅप्टन संतोश बाबू यांना महावीर चक्र
- मुंबई -शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्र सोडण्यात आले आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने एक पाऊल मागे घेतले असते तर 'प्रजासत्ताक दिनी' ट्रॅक्टर रॅली काढण्याची वेळ आलीच नसती असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. हे खरेच प्रजासत्ताक आहे का असा सवाल या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा -हे खरेच प्रजासत्ताक आहे का? सामनामधून केंद्रावर टीकास्त्र
- यवतमाळ - राजधानी दिल्लीत येत्या 26 जानेवारीला होणाऱ्या पथसंचलनात महाष्ट्रातील संतांचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चित्ररथावरील महाराष्ट्रातील संतांची शिल्पे ही यवतमाळच्या मातीत बनली आहेत. ही यवतमाळ जिल्हासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. दारव्हा तालुक्यातील अतिशय ग्रामीण भागात नखेगाव येथे राहत असलेल्या प्रवीण पिल्लारे, असे या शिल्पकाराचे आहे.
सविस्तर वाचा -यवतमाळच्या मातीत बनले महाराष्ट्राच्या चित्ररथावरील शिल्प
- नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत गायक एसपी बालसुब्रमण्यम, जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांसह सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्यासह १० जणांना पद्मभूषण तर, १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा -पद्म पुरस्कार : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंसह सिंधुताई सपकाळांचाही सन्मान
- पुणे - महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात पिंपरी-चिंचवडचे गिरीश प्रभुणे यांचा देखील सहभाग आहे. भटक्या- विमुक्त जाती-जमातींच्या विशेष करून पारधी समाजातील मुलांसाठी केलेले त्यांचे कार्य हे उल्लेखनीय आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच पुनरुत्थान समरसता गुरुकुलमध्ये आनंदाचे वातावरण होते. पुरस्कार मिळणार असून याबरोबरच जबाबदारी वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिक्षण पूर्ण झालेल्या पारधी समाजातील मुलांना त्यांना व्यवसाय सुरू करून द्यायचा आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.
सविस्तर वाचा -पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद; आता आणखी जबाबदारी वाढली- गिरीश प्रभुणे
- मुंबई : भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची यादी काल (सोमवार) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाली. यावर्षी एकूण 119 जणांना पद्म पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात 29 महिलांचा समावेश आहे. याशिवाय 10 परदेशी नागरिक, 16 जणांना मरणोत्तर पुरस्कार आणि एका तृतीयपंथीयाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यात 6 महाराष्ट्रीयन नागरिकांचाही समावेश आहे.