- मुंबई- राज्यात कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांमध्ये घट झाली आहे. मात्र तरी देखील संख्या ही चिंता वाढवणारीच आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात 24 हजार 645 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा :सोमवारी राज्यात 24 हजार 645 कोरोनाबाधितांची नोंद
- मुंबई : तुरुंगांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता कैद्यांनाही लस दिली जाणार आहे. कोविन ऍपवर नोंदणी न करता कारागृहातील नोंदणीच्या आधारे कैद्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी कारागृह व्यवस्थापनाला कस्तुरबा, नायर व जे.जे. रुग्णालय ही तीन रुग्णालये सूचवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
सविस्तर वाचा :मुंबईत तुरुंगातील वयोवृद्ध, आजारी कैद्यांचेही होणार लसीकरण
- मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. मागील काही दिवसांपासून येथील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढते आहे. आज सोमवारी दिवसभरात धारावीत ४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ६० ते ७०पेक्षाही कमी असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १८०वर पोहोचली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पालिकेने नियमावलीच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
सविस्तर वाचा :धारावीत पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; ४० नवीन रुग्णांची नोंद तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८०वर
- नवी दिल्ली - देशात पेट्रोल व डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असताना केंद्र सरकारला मिळणाऱ्या घसघशीत कमाईची आकडेवारी समोर आली आहे.गेल्या सहा वर्षात केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरून मिळणाऱ्या कर संकलनात ३०० टक्क्यांची वाढ झाली आहे. ही माहिती केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरातून दिली आहे.
सविस्तर वाचा :घसघशीत कमाई: केंद्राला पेट्रोल-डिझेलमधून मिळणाऱ्या करसंकलनात सहा वर्षात ३०० टक्क्यांनी वाढ
- नागपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीय. त्यांच्या निवासस्थानी एसआरपीएफचे सशस्त्र जवान, शहर पोलीस दलाचे जवान आणि खाजगी सुरक्षा रक्षक असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अँटिलिया, मनसुख हिरेन आणि आता परमबीर सिंग यांच्या पत्रावरून राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच फडणवीस यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे हे विशेष.
सविस्तर वाचा-देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढविली
- मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत परमबीर सिंग प्रकरणाबाबत चर्चा झाली. एखाद्या अधिकाऱ्याने पत्र लिहिले म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही. तसेच या मुद्द्यावर तिन्ही पक्षाचे नेते बैठक घेतील.