- मुंबई -शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात, राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून निघालेले शेतकरी आंदोलक काल (रविवार) मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानात आज होणाऱ्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी सहभागी होणार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्याच्या २१ जिल्ह्यामधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून मुंबईत दाखल झाले. याबाबत आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्याशी बातचीत केली. पाहा काय म्हणाले नवले...
सविस्तर वाचा -शेतकऱ्यांचा 'विराट' मोर्चा : डॉ. नवले यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित
- नवी दिल्ली - अडीच महिन्याच्या काळानंतर पुन्हा एकदा एलएसीवरचा तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात रविवारी चर्चा झाली. ही चर्चा चीनच्या हद्दीतील माल्डो या भागात झाली असून भारताकडून लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी नेतृत्व केले. यात एलएसी सीमारेषेवर मे महिन्यात जशी परिस्थिती होती, तशी परिस्थिती निर्माण करण्यात यावी आणि चीनी सैनिकांनी माघार घ्यावी, असे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मे महिन्यानंतर भारत-चीन सीमारेषेवर तणाव वाढला. यानंतर दोन्ही देशांचे ५०-५० हजार सैनिक लडाखमध्ये तैनात करण्यात आले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांदरम्यान नववी बैठक पार पडली आहे.
सविस्तर वाचा -भारत-चीन सीमावाद : अडीच महिन्यानंतर पुन्हा चर्चा; काय घडलं वाचा
- अमरावती - मागील 55 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. मागील 55 दिवसांपासून त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. आता अपेक्षा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करतील. पण तसे झाले नाही कारण पंतप्रधान मोदींचा हेखेखोरपणा आडवा आला आहे, अशी जहरी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
सविस्तर वाचा -'कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदींचा हेखेखोरपणा आडवा आला'
- पुणे (बारामती) - येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण महिला रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती नगरपालिका, प्रशासकीय भवन, तसेच शहरातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या चार खासगी रुग्णालयांचे अनेक दिवसांपासून फायर ऑडिटच झालेले नाही. तर अनेक ठिकाणी आग विझवण्यासाठी लावण्यात आलेल्या सिलेंडरची मुदत संपलेली आहे. तसेच फायर फायटिंग बॉक्सची दुरवस्था झाली असून ते केवळ शोभे पुरतेच असल्याचे दिसून आले.
सविस्तर वाचा -बारामतीतील खासगी व शासकीय कार्यालये, दवाखान्यांची फायर फायटिंग यंत्रणा रामभरोसे
- श्रीनगर -मंगळवारी साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर आणि काश्मीरमधील इतर ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सविस्तर वाचा -प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेत वाढ
- नागपूर- राज्यातील पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली ती पाहाता राज्य सरकार घरे बांधू शकणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरुन प्रसंगी खासगी विकासकांची मदत घेऊन राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जातील, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.