वॉशिंग्टन - अमेरिकेत जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षाची तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. नवनिर्वाचित अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन देशाचे 46वें राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर कमला हॅरिस अमेरिकेची पहिली महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत.
सविस्तर वाचा -Joe Biden inauguration : अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पहिल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरोधात मुंबईतील अंधेरी न्यायालयामध्ये मानहानीचा दावा दाखल केला आहे. या संदर्भात कंगनाला 22 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जुहू पोलिसांनी बजावले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगनाने काही वाहिन्यांवर जावेद अख्तर यांच्या विरोधात वक्तव्य करत हृतिक रोशन संदर्भात माझ्यावर जावेद अख्तर हे दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात जावेद अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे.
सविस्तर वाचा -कंगना हाजीर हो!, जावेद अख्तर यांच्या मानहानीच्या दाव्यानंतर जुहू पोलिसांनी बजावले समन्स
मुंबई - संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत जनाबाई यांचा देखावा यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात दिसणार आहे. ‘महाराष्ट्राच्या संत परंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
सविस्तर वाचा -यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात अवतरणार महाराष्ट्राची संत परंपरा
नवी मुंबई - रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट शुक्रवारी सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली. या चॅटची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मात्र, हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले जात असल्याचेही ते म्हणाले.
सविस्तर वाचा -'अर्णब गोस्वामीच्या लीक चॅटची सखोल चौकशी व्हावी'
गडचिरोली -ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान उमेदवाराने विषारी दारू पाजल्याने दोघांचा मृत्यू तर 50 हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपुर येथे बुधवारी (20 जानेवारी) घडली. बाधा झालेल्या तीन जणांना चंद्रपूरच्या रुग्णालयात तर एकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सविस्तर वाचा -ग्रामपंचायत निवडणूक : उमेदवाराने विषारी दारू पाजल्याने दोघांचा मृत्यू, 50 हून अधिक जणांना बाधा
रायगड : अलिबाग तालुक्यातील रामराज भागातील 40 वर्षापासून रखडलेला साबरकुंड मध्यम धरण प्रकल्प अद्यापही कागदावरच राहिलेला आहे. खैरवाडी, जांबुलवाडी आणि महान हा परिसर धरणाच्या पाण्याखाली बुडीत क्षेत्र म्हणून घोषित आहे. या गावातील साडेतीनशे कुटूंब विस्थापित होत असून 128 हेक्टर भातशेतीही धरणाखाली जात आहे. तिन्ही गावातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन रामराजमध्येच पुनर्वसन करावे आणि भूसंपादन नियमानुसार 22 टक्के भूखंड शासनाने द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे. लवकरात लवकर हे धरण व्हावे अशीही मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.