- मुंबई : राज्यात प्रथमच आज(सोमवार) कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली. आज ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर, ७ हजार ९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार ९४४ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा :राज्यात प्रथमच पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या जास्त, ८ हजार ७०६ कोरोनामुक्त
- ठाणे : कोविड -19 रुग्णांकडून अवाजवी बील आकारल्याने ठाण्यातील एका हॉस्पिटलवर करण्यात आली आहे. या हॉस्पिटलचा कोविड रुग्णालयाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा :ठाणे : अवाजवी बिल आकारल्याने मीरा रोडमधील गॅलेक्सी कोविड हॉस्पिटलची मान्यता रद्द
- मुंबई - राम मंदिर भूमिपूजन सोहोळ्यासाठी इतक्या वर्षांपासून जे रामभक्त वाट पाहत आहेत, ज्यांची या सोहळ्याला उपस्थित राहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, ज्यांच्यासाठी हा सर्वोच्च आनंदोत्सव आहे, त्या लाखो रामभक्तांचे काय करणार? त्यांच्या भावनेचे काय करणार, राम मंदिराचे ई-भूमिपूजन करू शकत नाहीत का? असा परखड सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केला.
सविस्तर वाचा :राम मंदिराचे ई-भूमिपूजन करू शकत नाही का? उध्दव ठाकरेंचा परखड सवाल
- मुंबई - राज्यात बकरी ईदसाठी काही नियम शिथील करण्यात यावेत. कुर्बानीसाठी बकरे सहजपणे बाजारात मिळतील अशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांसाठी आज (सोनवार) राज्यातील मुस्लिम आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मागील अनेक दिवसांपासून सरकारकडे आम्ही याचा पाठपुरावा करतोय, परंतु समाधानकारक उत्तर आले नसल्याने, आपणच आता पुढाकार घ्यावा, अशी मागणीही या आमदारांनी केली असल्याचे सांगण्यात आले. पवार हे मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर तोडगा काढतील, असा विश्वास यावेळी मुस्लिम आमदारांकडून व्यक्त करण्यात आला.
सविस्तर वाचा :मुस्लिम आमदारांनी पवारांकडे मांडल्या व्यथा, बकरी ईदच्या कुर्बानीसाठी नियम शिथील करण्याची मागणी
- कोल्हापूर - रामजन्मभूमी मुक्त होण्यासाठी ५०० वर्षे संघर्ष करावा लागला. मात्र, शिवसेना कायमच यासाठी काहीही न करता रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी आमचा मोठा वाटा असल्याचा दावा करत आली आहे. अशी खरमरीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागणी केलेल्या रामजन्मभूमीच्या ई-भूमीपूजनाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेला लक्ष केले.
सविस्तर वाचा :ठाकरेंना हिंदुत्वापेक्षा खुर्ची महत्त्वाची; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका..
- गडचिरोली : मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात घडवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी मुख्य मार्गावर भूसुरुंग स्फोट पेरून ठेवले होते. मात्र नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. चामोर्शी तालुक्यातील रेगडी-कोटमी मार्गावर सुमारे १० किलो वजनाचा भूसुरुंग स्फोट गडचिरोली पोलिसांकडून निकामी करण्यात आला.