मुंबई- माळशिरसमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू...शेतात कामासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू... यासह महत्वाच्या घटना वाचा एका क्लिकवर...
माळशिरस (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील तंरगफळ गावात आज (गुरुवार) सकाळी गॅस गळतीनंतर सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये आई आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आई सोनल ज्ञानेश्वर शिंदे (३०) आणि सावळा (७) कृष्णा (५) अशी मृत्यू पावलेल्या आई व मुलांची नावे आहेत.
वाचा सविस्तर - माळशिरसमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
नागपूर- कामाला गेलेल्या चिमुकल्या मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना कोंढाळी जळील घुबडी शिवारात घडली आहे. भाग्यश्री येडमे आणि अर्चिता मंगाम असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
वाचा सविस्तर - धक्कादायक; शेतात कामासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू
नवी दिल्ली -निमलष्करी दलात 'ट्रान्सजेंडर' म्हणजेच तृतीयपंथीयांची भरती करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय गंभीरपणे विचार करत असून विविध निमलष्करी दलांकडे सूचना मागविल्या आहेत. निमलष्करी दलात 'असिस्टंट कमांडंट' पदावर तृतीयपंथीयांची भरती करण्याचा विचार गृहमंत्रालय करत आहे.
वाचा सविस्तर -निमलष्करी दलात तृतीयपंथीयांच्या भरतीबाबत गृहमंत्रालयाने मागितल्या सूचना
नवी दिल्ली :कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. मंत्रालयाच्या नव्या नियमानुसार आता, खासगी डॉक्टरांनाही एखाद्या रुग्णाला कोरोना चाचणीसाठी पाठवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांवर भर देण्याचा केंद्राचा निर्णय खऱ्या अर्थाने लागू होण्यासाठी मदत होणार आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांसोबत झालेल्या एका बैठकीनंतर केंद्राने हा निर्णय घेतला आहे.
वाचा सविस्तर - आता खासगी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरही करता येणार कोरोना चाचणी; आरोग्य मंत्रालयाचा निर्णय
मुंबई - कोरोना विषाणूचे मुंबईत गुरूवार (दि. 2 जुलै) नवे 1 हजार 554 रुग्ण आढळून आले असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 80 हजार 262 वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा 4 हजार 686 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 5 हजार 903 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 50 हजार 694 वर पोहचला आहे. मुंबईत सध्या 24 हजार 882 सक्रिय रुग्णांवर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 63 टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.