- मुंबई : देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, सलग दुसऱ्या दिवशी सहा हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली असून राज्यात आज कोरोनाच्या ६,५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सविस्तर वाचा :COVID-19 : राज्यात आज आढळले ६,५५५ नवे रुग्ण; तर ३,६५८ रुग्णांना डिस्चार्ज..
- कल्याण डोंबिवली (ठाणे) - कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात खाट मिळत नसल्याचे सांगत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील कठड्यावर व रुग्णालयाच्या आवारातच बसवून रुग्णांना ऑक्सिजन लावले जात असल्याचे धक्कादायक वास्तव कल्याण-डोंबिवली महापालीकेच्या शास्त्रीनगर रुग्णलयात समोर आले आहे.
सविस्तर वाचा :धक्कादायक..! कोरोनाबाधित रुग्णांना कठड्यावर अन् रुग्णालयाच्या आवारात बसवून ऑक्सिजन पुरवठा
- मुंबई - ऑनलाइन शिक्षण आणि त्याचा प्रसार करण्यासाठी दूरदर्शनने नाकारल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी थेट अंबानी ग्रुपच्या जिओ चॅनलचा आधार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आज (दि. 5 जुलै) जिओवरील ज्ञानगंगा नावाच्या तीन चॅनलचे आणि जियो सावनवरील रेडिओ वाहिनीचे उद्घाटन केले असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.
सविस्तर वाचा :दूरदर्शनने नाकारल्याने शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतला जिओचा आधार
- ठाणे - त्या 12 आमदारांची काळजी खा. संजय राऊत्यांनी करू नये, त्यांनी महाराष्ट्राची काळजी करीत कोवडी रुग्णांची काळजी करावी. त्यांनी कोविड रुग्णांना उपचार मिळत नाही. अशा रुग्णाचे काय होणार? हा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला असता तर मला आनंद झाला असता, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.
सविस्तर वाचा :'त्या 12 आमदारांची काळजी खासदार राऊत यांनी करू नये'
- पुणे- मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने चांगलीच मुसंडी मारली आहे. हीच स्थिती पुढील चार दिवस कायम राहणार असून आज (दि. 5 जुलै) आणि उद्या (दि. 6 जुलै) मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय येत्या चार दिवसात कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सविस्तर वाचा :येत्या ७२ तासांत कोकण, मराठवाडा, विदर्भ अन् मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
- मुंबई -नियमावली निश्चित करून राज्यात सलून सुरू केल्यानंतर आता नियम आणि अटींसहीत हॉटेल सुरू करण्यावर राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून, ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.