महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Top 10 @ 11 AM : सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - corona updates

राज्यासह देशभरातील सकाळी ११ वाजेपर्यतच्या महत्वाच्या ठळक घडामोडी वाचा एका क्लिकवर...

todays-top-ten-news-at-11-am
सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

By

Published : Jul 19, 2020, 11:08 AM IST

मुंबई -रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या औषधाची 30 हजार रुपयांना विक्री केली जात होती. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) रविवारी रात्री मुलुंड येथे छापा टाकत ही कारवाई केली.

वाचा सविस्तर - रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; मुलुंडमध्ये 7 जणांना अटक

नवी दिल्ली -अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नितिशास्त्र समितीने शनिवारी स्वदेशी विकसित लस 'कोव्हॅक्सिन'ची मानवी क्लिनिकल चाचणी घेण्यास मान्यता दिली. ही चाचणी प्रकिया सोमवारपासून सुरू होणार आहे.

वाचा सविस्तर - एम्सकडून सोमवारपासून सुरु होणार 'कोव्हॅक्सिन' लसीची मानवावर चाचणी

हैदराबाद - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासात देशात सर्वाधित 35 हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात कोरोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा आता 10 लाख 38 हजार 716 वर पोहचला.

वाचा सविस्तर - देशात मागील 24 तासात 35 हजार नवे कोरोनाबाधित; देशभरातील स्थिती एका क्लिकवर...

मुंबई- राज्यातील काही जिल्ह्यांत टाळेबंदी घोषित केली असली तरी कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. सलग चौथ्या दिवशी आठ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या नोंदवली गेली आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

वाचा सविस्तर - सलग चौथ्या दिवशी संसर्गाचा गुणाकार; आठ हजारांपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील बहुसंख्य शेतकरी धान उत्पन्न घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. या शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळ वाचावा यासाठी सिंदेवाही कृषी संशोधन केंद्राने एक उपकरण तयार केले. 'डायरेक्ट पॅडीसीडर' असे या उपकरणाचे नाव असून या माध्यमातून भात उत्पादक शेतकऱ्यांचा एकरी साडेसहा हजार रुपये एवढा खर्च वाचणार आहे.

वाचा सविस्तर - ..तर डायरेक्ट पॅडीसीडर उपकरणाने येणार तांदूळ उत्पादनात क्रांती; खर्च आणि वेळही वाचणार

उस्मानाबाद - तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात कोरोना संशयित रुग्णांना 'शेवाळयुक्त' पाण्यातून ऑक्सिजन पुरवठा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ 'ई टीव्ही भारत'च्या हाती लागला आहे.

वाचा सविस्तर - धक्कादायक! तुळजापुरात 'शेवाळ'युक्त पाण्यातून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा

सोलापूर -बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात भगतसिंह यांच्यासोबत ज्यांचा उल्लेख झाला आहे. ते कुर्बान हुसेन हेही फासावर गेलेले क्रांतिकारक होते. परंतु काही जणांनी कुर्बान हुसेन यांचे नाव काढून सुखदेव यांचे नाव समाविष्ट करावे, अशी मागणी केली आहे.

वाचा सविस्तर -'हुतात्मा कुर्बान हुसेन स्वातंत्र्य लढ्यातील खरे हिरो, बालभारतीत नव्याने नाव समाविष्ट करा'

नवी दिल्ली -आमदार खरेदी प्रकरणी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी 8 सदस्यांची विशेष टीम गठित केली आहे. एसओजी व्यतिरिक्त एटीएस, सीआयडी सीबी आणि जोधपूर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर -आमदार खरेदी प्रकरण : ऑडिओ क्लिपची 8 सदस्यीय पथक करणार चौकशी

मुंबई - राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांनी शनिवारी १ लाखाचा टप्पा गाठला आहे. तर कोरोनामुळे मुत्यू झालेल्या रुग्णांची सख्या ५ हजार ६४७ वर पोहोचली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत आहे.

वाचा सविस्तर -चिंताजनक! एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार

गोंदिया -कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊन काळात सर्वच उद्योग ठप्प झाल्यामुळे अनेकांवर आर्थिक संकाटाची कुऱ्हाड कोसळली. अनेक मेट्रो शहरातील तसेच इतर ठिकाणी असलेल्या उद्योग, व्यवसायांमध्ये कर्मचारी कपात करण्यात आली.

वाचा सविस्तर -कोरोना इफेक्ट : शेणापासून राखी तयार करत तिने अनेकांना दिला रोजगार

ABOUT THE AUTHOR

...view details