महाराष्ट्र

maharashtra

Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

By

Published : Jul 4, 2020, 11:04 AM IST

राज्यासह देशभरातील सकाळी ११ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या १० बातम्या वाचा एका क्लिकवर

सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

मुंबई - जयपूरमध्ये वंदे भारत मोहिमे अंतर्गत परदेशातून विमानाने देशात येणाऱ्या एका प्रवाशाकडून ३२ किलो सोने जप्त करण्यात आले... अहमदाबादमध्ये एका महिला पोलीस निरीक्षकाने ३५ लाखांचा घोटाळा केला आहे.. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या एका विद्यमान नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे.. यासारख्या महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

जयपूर -लॉकडाऊननंतर विमानसेवा सुरु होताच सोने तस्करीच्या घटना समोर आल्या आहेत. केंद्र सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत विदेशात राहणाऱ्या भारतीयांना देशात आणले जात आहे. याच दरम्यान दुबईहून जयपूरला येणाऱ्या प्रवाशांकडून कस्टम विभागाने येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर 32 किलो सोने जप्त करत मोठी कारवाई केली आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

वाचा सविस्तर-जयपूर विमानतळावर 32 किलो सोने जप्त; वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून आले आरोपी

अहमदाबाद - शहरातील पश्चिम पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलीस निरीक्षकाने ३५ लाखाचा घोटाळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार काईम ब्रँचकडून करण्यात आली आहे. श्वेता जडेजा असे गुन्हा दाखल झालेल्या महिला पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

वाचा सविस्तर -अहमदाबादमध्ये महिला पोलीस निरीक्षकाकडून ३५ लाखाचा घोटाळा, गुन्हा दाखल

पुणे- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाने बळी जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. याचा फटका लोकप्रतिनीधींनाही बसत आहे. आज पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीच्या एका विद्यमान नगरसेवकाचा आज सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वाचा सविस्तर-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई- दरवर्षी 4 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, यावर्षी या सहकार दिनावर कोरोनाच्या महामारीचे सावट आहे. मानवाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतित प्रगतीची मुख्य प्रेरणा सहकार हीच आहे. आदीमानव काळापासून आत्तापर्यंत मानवाच्या सहकार प्रवृत्तीमुळेच आपली प्रगती करुन घेतली आहे. आज सहकार दिनानिमित्त ईटीव्ही भारतने सहकार क्षेत्राचा घेतलेला आढावा....

वाचा सविस्तर -आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त सहकारी क्षेत्राचा घेतलेला आढावा...

मुंबई- शासन निर्णय मराठीत हवा या मागणी संदर्भातील पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे व अनिल शिदोरे यांनी आज राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना दिले आहे. या पत्राची एक प्रत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील दिली आहे.

वाचा सविस्तर -शासन निर्णयही मराठीत हवा, मनसे नेते अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सोलापूर -साडेएकवीस लाख कोटीचे पॅकेज सरकारने जाहीर केले. त्यात उद्योजकांच्या कर्जासाठी साडेअकरा लाख कोटी राखून ठेवले, भांडवलदारांचे साडेसात लाख कोटी कर्जमाफी केली तर कामगारांसाठी साडेतीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली. जनधनच्या नावाने फक्त 500 रुपयांची मदत दिली. ही विसंगती आम्हाला मान्य नाही. केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीकडून 3 जुलै हा दिवस मागणी दिन पाळण्याची हाक देण्यात आली होती

वाचा सविस्तर- ..तर एक लाख कामगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयवर धडकेल - आडम मास्तर

बारामती- टिकटॉक अॅपने अनेकांना करमणुकीसह आर्थिक कमाईची करून दिली. मात्र, भारत-चीन सीमेवरील तणावानंतर भारताने चीनच्या जवळपास ५९ अॅपवर बंदी आणली त्यात टिकटॉकचाही समावेश आहे. मात्र, टिकटॉक बंद झाल्याने अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाहीतर काही जणांना अश्रू अनावर झाल्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे.. जो 'एस क्यू.. आर क्यू.. झेड क्यू.. 'बँड इज बँड...बुक्कीत टेंगुळ गुलीगत...' या अशा विनोदी डायलॉगसाठी टिकटॉकच्या माध्यमातून अल्पावधीतच नावारुपाला आला. तो टिकटॉक फॅन सुरज चव्हाण सध्या नाराज असल्याचे दिसून येत आहे.

वाचा सविस्तर -बँड इज बँड..! टिकटॉक फेम 'गुलीगत'वर बेकारीची कुऱ्हाड; १५ लाख होते फॉलोवर्स...

ठाणे- अज्ञात टोळक्याकडून एका युवकाची धारदार हत्याराने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तर याच हल्लेखोर टोळीच्या हल्ल्यात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना उल्हासनगर कॅम्प ४ मधील रेल्वे स्टेशन जवळील मद्रासी पाड्यात शुक्रवारी मध्यरात्री घडली

वाचा सविस्तर -खळबळजनक! अज्ञात टोळीकडून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, दोन जण गंभीर जखमी

नागपूर- सलग तीन महिने कोरोनाच्या विषाणूंपासून अलिप्त राहिलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोना अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये कारागृहात कामाला असणारे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीय कोरोनाबाधित होण्याची संख्या ९६ झाली आहे. २५ जूनला कारागृहातील एका कर्मचाऱ्यामध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करुन त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती..

वाचा सविस्तर -नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या जवळ

सातारा- छत्रपती घराण्याची सातारा ही राजधानी आहे. उदयनराजे छत्रपती घरण्याचे 13 वे वंशज आहेत. त्यांच्या स्टाईला प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यांचे बिनधास्त वागणे असल्याने अनेकांना ते आवडतात. गुरुवारी जलमंदिर या त्यांच्या निवासस्थानी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान बिनधास्त उदयनराजे, तर गृहमंत्री देसाई हे वाकून नमस्कार करताना पहिला मिळाले, हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
वाचा सविस्तर - खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना गृहराज्यमंत्र्यांचा मुजरा..?

ABOUT THE AUTHOR

...view details