मुंबई- शिवसेना आणि कंगना रणौतचा वाद शमण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. बुधवारी कंगना मुंबईत दाखल होण्यापूर्वी बीएमसीने कारवाई करत तिचे घराचे अनधिकृत बांधकाम पाडले. त्यानंतर बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी करत शिवसेनेला बाबरसेनेची उपमा दिली होती. मात्र, ती तेवढ्यावरच थांबली नसून कंगनाने आज शिवसेनेला थेट सोनिया सेना म्हणत पुन्हा टीका केली आहे. यावर आता शिवसेनेकडूनही कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
वाचा सविस्तर - सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' झालीय - कंगना
मुंबई -कंगनाच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामाच्या कारणावरून मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवल्यानंतर संतप्त झालेल्या कंगनाने वाटेल तसा निशाणा साधत शिवसेनेला बाबरची सेना देखील म्हटलं. कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कारवाईमागे कोणतीही बदल्याची भावना नाही ”बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत. त्यामुळे बाबर आणि बाबरी बद्दल तिने न बोललेच बरे असे चोख प्रत्युत्तर दिले आहे.
वाचा सविस्तर - बाबरी पाडणारे आम्हीच आहोत’; कंगनाच्या ‘बाबर सेना’ टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर
मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेतील वाद आता आणखी नवे वळण घेण्याचे संकेत देत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता यांना निमंत्रीत करून कंगना प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाला खतपाणी मिळण्याची चिन्ह आहेत.
वाचा सविस्तर -कंगनाचा वाद 'राजभवना'च्या अंगणात...राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांना केले पाचारण
नवी दिल्ली - दिवसेंदिवस देशातील कोरोनाचा उद्रेक वाढत असून मागील चोवीस तासांत 95 हजार 735 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच एक हजार 172 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 44 लाख 65 हजार 864 झाली आहे. यामधील 9 लाख 19 हजार १८ अॅक्टिव्ह केसेस आहेत.
वाचा सविस्तर -देशात कोरोनाचा उद्रेक, 44 लाखांचा टप्पा पार, मागील चोवीस तासांत 95 हजार 735 'पॉझिटिव्ह'
मुंबई - कुठलीही योजना कागदावर चांगलीच असते. तिचा उद्देशही चांगलाच असतो. प्रश्न असतो तो पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणीचा. त्यात जेव्हा गडबड होते तेव्हा त्यावरून केलेली बडबड ‘पोकळ’ आणि खर्च ‘वायफळ’ ठरतो. जलयुक्त शिवार योजनेचे तेच झाले. ‘कॅग’ने मारलेल्या ताशेऱ्यांचा तोच अर्थ आहे. अंमलबजावणी प्रभावी झाली असती तर राज्यातील शिवारे खऱ्या अर्थाने ‘जलयुक्त’ झाली असती, असा टोला शिवसेनेने मुखपत्र सामनामधून तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे.
वाचा सविस्तर -पोकळ आणि वायफळ बडबडीने ‘जलयुक्त’चा फुगा फुटला!