महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रविवारी 'या'वेळेत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक - todays mega block on Mumbai station

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजतापर्यंत आज मेगाब्लॉक असणार आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरुळ अप व डाऊन मार्गावर आज (रविवार) सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजतापर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे.

todays mega block on central railway
आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

By

Published : Jun 20, 2021, 11:56 AM IST

मुंबई -उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी आज (रविवार) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी अप डाऊन मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजतापर्यंत आज (रविवार) मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत अप- डाऊन धीम्या मार्गावरील वाशी/ बेलापूर/पनवेल- सीएसएमटी वडाळा रोड आणि सीएसएमटी-वांद्रे -गोरेगाव दरम्याच्या लोकल सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, याकरिता मध्य रेल्वेकडून पनवेल आणि कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच या ब्लॉक कालावधीमध्ये हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.


ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -

मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरुळ अप व डाऊन मार्गावर आज (रविवार) सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजतापर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी ठाणे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून ठाण्याकरीता सुटणाऱ्या सर्व लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळी ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावते, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - रेल्वेतील सर्वाधिक लांबीची भूमिगत जल वाहिनी होतेय तयार; पावसातही रेल्वे सुरू राहणार असल्याचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details