- 2:14 PM - मुंबई - जुहू चौपाटीवर घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी गर्दी वाढू लागली.
- 1:47 PM - मुंबई - परळच्या राजाची गणेश मूर्ती खूप उंच असल्याने ती पुलाला घासली गेली. शेष नागाचा काही भाग घासला आहे. थोड्या वेळाने ती पुढे काढण्यात आली.
- 1:32 PM - पुणे - उदयनराजे नाराज नाहीत, भाजपच्या गोटातूनच पक्षांतराच्या अफवा पसरवल्या जात आहेत - धनंजय मुंडे
- 1:00 PM - मुंबई - गणेश गल्ली आणि डी लाय रोड येथील गणपती आत्ता मागोमाग निघाले आहेत.
- 1:02 PM - दादर चौपाटी येथे समुद्रात करण्यात येणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दुप्पट कृत्रिम तलावात विसर्जन. दुपारी 12 पर्यंत समुद्रात 18 गणेश मूर्तींचे विसर्जन तर कृत्रिम तलावात 36 हुन अधिक मूर्त्यांचे विसर्जन
- 12:19 PM - लातूर - सर्वत्र गणेश विसर्जनाची लगबग असली तरी लातुरात यंदा गणेश मूर्तींचे विसर्जन नाही तर मूर्तीचे दान केले जाणार आहे. विसर्जन ठिकाणच्या विहिरी कोरड्याठाक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून संकलन होण्यास सुरुवात झाली आहे...
- 12:09 PM - मुंबई - दादर चौपाटी येथे बेस्ट विद्युत उपक्रमाच्या प्रभादेवी येथील गणेश मूर्तीचे विसर्जन. गणेशोत्सवाचे 25 वे वर्ष. वेतन करार होऊन बेस्ट कामगारांना भरघोस पगार वाढ मिळू दे. बेस्ट कामगारांची गणेशाकडे मागणी. किशोर देशमुख सब इंजिनियर बेस्ट विद्युत उपक्रम यांनी दिली माहिती.
- 11:55 AM - रायगड - अनंत चतुर्थी गणेश विसर्जनासाठी जिल्हा पोलीस, स्थानिक प्रशासन सज्ज
- 11:49 AM - हिंगोली - नवसाचा गणपती म्हणून सर्व दूर ओळख असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपती च्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील वाहतूक जागोजागी वळवण्यात आली आहे. भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.
- 11:47 AM - यवतमाळ - झारीजामनी तालुक्यात आलेल्या पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू.
- 11:40 AM - मुंबई - दादर चौपाटी येथे घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यास सुरुवात होत आहे. गणेश विसर्जन करण्यासाठी गणेश भक्त आपल्या कुटुंब आणि मित्रमंडळीसह चौपाटीवर येत आहेत. तुरळक गणेश विसर्जन सुरू आहे. दुपारनंतर दादर चौपाटी येथे मोठ्या संख्येने गणेश विसर्जनासाठी गर्दी होण्याची शक्यता.
- 11:26 AM - नागपूर - मानाचा गणपती- नागपूरच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणुकीला सुरवात. हजारोंच्या भक्त देत आहेत लाडक्या बाप्पा निरोप
- 11:23 AM - अकोला - मानाचा गणपती बारभाई चे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते पूजन करून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ
- 11.02 AM - विसर्जन मिरवणुकीला सुरवात...मानाच्या पहिल्या कसबा गणपती समोरील ढोल पथकात अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि श्रुती मराठे यांचा सहभाग
- 10:37 AM - मुंबई - लालबागचा राजा पूर्वी तेजोकाय गणपतीची मिरवणूक निघाली
- 10:38 AM - पुणे - पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात मानाचा पहिला कसबा गणपती चे पूजन करुन मंडई इथल्या टिळक पुतळ्याला हार घालून मिरवणूकिला सुरुवात
- 10:43 AM -अहमदनगर- ग्रामदैवत आणि मानाचा अग्रस्थानी असणाऱ्या श्री विशाल गणपती मंदिराच्या उत्सव मूर्तीची मिरवणुकीस प्रारंभ.. जिल्हाधिकारी संजीव कुमार यांच्या हस्ते उत्तरपूजेनंतर मिरवणुकीस प्रारंभ..
- 10.27 AM -उदयनराजे शरद पवार यांच्या भेटीला. पुण्यातील पवारांचे निवासस्थान मोतीबागेत घेणार पवारांची भेट. उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागणार.
- 10.15 AM - जुहू चौपाटी येथे घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जनाला आगमन सुरू
- 9.53 AM - मुंबई - गिरगाव चौपाटी येथे विसर्जनाला सुरुवात
- 8:49 AM - मुंबई - लालबागचा राजा विसर्जनाला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. जीर्ण पुलांवरील वाहतुकीवर र्निबधांमुळे मिरवणूक रखडण्याची शक्यता.
- 8:48 AM - गडचिरोली - रात्रीपासून जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे परत एकदा भामरागड मार्ग बंद
- 8:47 AM - सातारा - पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर डी- मार्ट जवळ खासगी बस व ट्रकच्या अपघातामध्ये सहा ठार. वीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी सातारा तालुका पोलीस दाखल.
आज आत्ता.. परळच्या राजाची गणेश मूर्ती खूप उंच असल्याने पुलाला घासली - मुंबई
झरझर नजर...दिवसभरातील ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर
आज आत्ता
Last Updated : Sep 12, 2019, 2:49 PM IST