-
2:50 PM मुंबई - गणेशभक्तांसाठी विसर्जनाला पश्चिम मार्गावरून रेल्वेच्या 12 व 13 तारखेला जादा लोकल गाड्या.
- 2:16 PM ठाणे - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध वास्तूंचे उद्घाटन
- हजुरी येथे भव्यमहावीर जैन रुग्णालय व प्रताप आशर कार्डिअॅक सेंटरचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले..
- तसेच गडकरी रंगायतन येथील सावरकर स्मृतीचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार...त्यानंतर ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे उद्धव ठाकरे संबोधित करणार....
-
2:09 PM औरंगाबाद - 13 आणि 14 तारखेला जयंत पाटील आणि काँग्रेस यांच्यासोबत बोलणी होईल, आणि आघाडी बाबत जागावाटप फायनल होईल - सुळे
- 2:08 PM औरंगाबाद - मुख्यमंत्र्यांनी 2014 मध्ये अनेक नेत्यांना अलिबाबा आणि चाळीस चोर म्हटले होते, आता त्यांनी ज्यांना चोर म्हटले होते. त्यांनाच पक्ष प्रवेश का देत आहेत? का त्यांना सौ खून माफ केले. सरकारने याचे उत्तर द्यावे - सुप्रिया सुळे
- 2:04 PM औरंगाबाद - महापोर्टल बाबत ज्या तक्रारी आहेत, त्याबाबत सरकारने सुधारणा करावी - सुळे
-
2:03 PM औरंगाबाद - भगवा झेंडा कोणाची मक्तेदारी नाही, छत्रपती सर्वांचे होते.
- 2:03 PM औरंगाबाद - सरकारचा लाडका शब्द पारदर्शकता आहे, मात्र ते सोडून त्यांच्याकडे वेगळच दिसतं
- 2:03 PM पुणे - पुण्यात येणाऱ्या महाजनादेश यात्रे दरम्यान मराठा क्रांती मोर्चाकडून लक्षवेधी आंदोलनाचा इशारा; विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार
- 1:59 PM औरंगाबाद - स्मृती इराणीने आणलेले बिल चांगलं होते, तर आम्ही त्यांना समर्थन केले. परीक्षेत पास होण्यासाठी बसतो आणि मी तर मेरिटमध्ये येते, निवडणूक होऊन तीन महिने झाले तरी सर्वांना बारामती लागते, माझी बारामती तितकी सुंदर आहे - सुळे
- 1:56 PM औरंगाबाद - मेगा भरती पक्षात सुरू आहे देशात नाही. हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत माझे कौटुंबिक संबंध, त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही - सुप्रिया सुळे
- 12.35 PM गडचिरोली - दोन आत्मासमर्पित नक्षलवाद्यांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार; एक गंभीर जखमी, तर एकाचे अपहरण
- 11:30 AM मुंबई - अखंड भीमज्योती कार्यक्रमात पावसामुळं व्यत्यय
- 11:12 AM मुंबई - कार्यक्रम सुरु; रामदास आठवले यांचे अद्याप आगमन नाही, पावसामुळे आला व्यत्यय
- 11:11 AM रायगड - समाजमाध्यमांवर झळकताहेत अलिबागचे भावी आमदार... उमेदवारी जाहीर होण्याआधीच अलिबागमध्ये इच्छुक उमेदवार झाले भावी आमदार
- 11:18 AM मुंबई- हर्षवर्धन पाटील यांनी लालबागच्या राजाचे घेतले दर्शन .
आज.. आत्ता.. : भगवा झेंडा कोणाची मक्तेदारी नाही, छत्रपती सर्वांचे होते - सुप्रिया सुळे - आज.. आत्ता..
झरझर नजर...दिवसभरातील ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर
11:01 AM नागपूर - जिल्ह्यातील खापा परिसरात आलेल्या पुरात अडकली 9 माकडं, वन कर्मचारी, वनरक्षक आणि अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून माकडांची केली सुटका..
10.51 am - औरंगाबाद - कुत्र्याने चावा घेतल्याने दोन वर्षीय मुलीचा मृत्यू, अक्षरा राजू वावरे अस मुलीचे नाव, रेबीज इंजेक्शन घेऊनही मुलीचा मृत्यू
10:16 AM मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देणाऱ्या 'अखंड भीमज्योती'चे लोकार्पण थोड्याच वेळात चैत्यभूमी येथे केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार लोकार्पण सोहळा.