राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
- संयुक्त राष्ट्राला पीएम करणार संबोधित -
संयुक्त राष्ट्राला पीएम करणार संबोधित
जमिनीचे वाढते प्रदूषण, होत असलेला ऱ्हास आणि पडत असलेला दुष्काळ या मुद्दावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्र संघटनेने आयोजित केलेल्या व्हर्चुअल कार्यक्रमामध्ये संबोधित करणार आहेत.
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना १४ जून रोजी जागतिक रक्तदान दिवस साजरा करते.
दिल्लीत आजपासून अनलॉक 3 ला सुरुवात करण्यात आली आहे. या दरम्यान मार्केट, मॉल हे ओपन होणार आहेत. तर शाळा - कॉलेज हे बंद राहणार आहेत.
- देशभरातील व्यापारी आज करणार ई- कॉमर्स शुद्धीकरणची मागणी
आज करणार ई- कॉमर्स शुद्धीकरणची मागणी
भारताला आत्मनिर्भर बनवायचे असेल तर देशातील व्यापाऱ्यांना आणि उद्योगाला सक्षम करावे लागेल, या मागणीचे पत्र व्यापारी मेलच्या माध्यमातून पंतप्रधानांना पाठवणार आहेत. देशातील ४००० संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत.
- मंत्री अशोकराव चव्हाण करणार भोकरचा दौरा
मंत्री अशोकराव चव्हाण करणार भोकरचा दौरा
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण नियोजित असलेला आज भोकरचा दौरा करणार आहेत. यावेळी ते येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.
- आज सोलापूरात ऑनलाईन रोजगार मेळावा !
आज सोलापूरात ऑनलाईन रोजगार मेळावा !
सोलापूर जिल्ह्यातील सात औद्योगिक कंपन्यातील 438 रिक्त पदांची भरती करण्यासाठी 14, 15 आणि 16 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
- सुशांत सिंह राजपूत यांची आज पुण्यतिथी
सुशांत सिंह राजपूत यांची आज पुण्यतिथी
लोकप्रिय अभिनेते सुशांतसिंग राजपूत यांनी आज आत्महत्या केली होती. त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.
- राज ठाकरे यांचा आज वाढदिवस
राज ठाकरे यांचा आज वाढदिवस
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५३ वा वाढदिवस आहे.