राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
- प्रधानमंत्री करणार G7 शिखर परिषदेला संबोधित
प्रधानमंत्री करणार G7 शिखर परिषदेला संबोधित
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ४७ व्या जी-७ या शिखर परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. ते आज या परिषदेला संबोधित करणार आहेत.
- आज मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
आज मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर आज (रविवार) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानाकादरम्यान अप डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.
- मंत्री अशोकराव चव्हाण यांचा बिलोली तालुक्यात दौरा, करणार विविध कामाचे उद्घाटन
सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते ४२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करणार आहेत.
- महाराणा प्रताप सिंहयांची आज जयंती
महाराणा प्रताप यांची आज जयंती
देशातील पहिले स्वातंत्र सैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि वीरता आणि युद्ध कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराणा प्रताप सिंहयांची आज जयंती आहे. त्याचा जन्म १५४० मध्ये कुंभलगड येथे झाला होता. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते.
- आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस
आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज (१३ जून) वाढदिवस आहे. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणी असून युवासेना या शिवसेनेच्या युवाकेंद्रित संघटनेचे प्रमुख आहेत. मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत त्यामुळेच यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळवे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
- आज दिल्ली ते बिहार ही विशेष रेल्वे
आज दिल्ली ते बिहार ही विशेष रेल्वे
आजपासून (१३ जून)सुरू होणारी विशेष रेल्वे ही दिल्ली, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यातून जाणार आहे. ही रेल्वे नव्वी दिल्ली ते मालदा गावपर्यंत असणार आहे. ती बक्सर, आरा, पटना जंक्शन, किऊल जंक्शनवरून मालदा अशी धावणार आहे.
- आजविश्वनाथन आनंद सोबत आमिर खान खेळणार बुद्धिबळ
विश्वनाथन आनंद आणि आमिर खान
आज बॉलिवूड स्टार आमिर खान हे बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंदबरोबर बुद्धिबळ खेळणार आहे. हा सामना चेस इंडियाच्या यूट्यूब चैनल थेट प्रसारित होणार आहे. त्याच्यात पाच वेळा हा सामना खेळला जाणार आहे.
- आजफ्रेंच ओपन पुरुष एकेरीची अंतिम लढत
फ्रेंच ओपन पुरुष एकेरी आज अंतिम सामना
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या French Open 2021 : फ्रेंच ओपन टेनिस टूर्नामेंट पुरुष एकेरीचा आज अंतिम सामना होणार आहे. तो जोकोविच विरूद्ध सिट्सिपस यांच्यमध्ये रोलँड गॅरोस येथे खेळला जाणार आहे.
- UEFA 2020: रशिया आणि बेल्जियममध्ये आज सामना
UEFA 2020: रशिया आणि बेल्जियममध्ये आज सामना
युरोपचा फुटबॉल वर्ल्डकप म्हणून ओळखला जाणाऱ्या युरो कपला दणदणीत सुरुवात झाली. आज रशिया आणि बेल्जियममध्ये सामना होणार आहे.
- आज फिल्पकार्डवर बंपर सेल ऑफर
आज फिल्पकार्डवर बंपर सेल ऑफर
फिल्पकार्डचा सेल आजपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूवर मोठ्या प्रमाणात सुट मिळणार आहे.