महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर - केंद्रिय अर्थमंत्री सीतारमण

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

TODAYS IMPORTANT EVENTS ACROSS COUNTRY AND STATE
राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : Jun 12, 2021, 6:46 AM IST

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

  • आज जागतिक बालकामगार विरोधी दिन
    जागतिक बालकामगार विरोधी दिन

ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफ-सफाई करायची, भांडी, कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे अशी अनेक कामे ही चिमुरड्या बालकांना करावी लागतात. या बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता 12 जून हा दिवस देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.

  • प्रधानमंत्री हे G7 शिखर परिषदेत सहभागी होणार
    प्रधानमंत्री हे G7 शिखर परिषदेत सहभागी होणार

यूनाइटेड किंगडमने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ४७ व्या जी-७ या शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. प्रधानमंत्री हे या परिषदेत आज सहभागी होणार आहेत.

  • आज आयएमए देहरादून येथे पासिंग आउट परेड -
    आज आयएमए देहरादून येथे पासिंग आउट परेड

देहरादून येथील प्रतिष्ठित भारतीय सैन्य अकादमी (आयएमए) च्या पासिंग आउट परेड (पीओपी) आज होणार आहे. सध्याच्या कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, या वेळी पालक आणि कॅडेटचे कुटुंबातील अन्य सदस्य पीओपीमध्ये येऊ शकणार नाहीत. तथापि, या संपूर्ण कार्यक्रमाचे विविध माध्यम वाहिन्यांवरून थेट प्रसारण होणार आहे.

  • विदेश मंत्री एस जयशंकर आजपासून तीन दिवस केनियाच्या दौऱ्यावर -
    विदेश मंत्री एस जयशंकर

विदेश मंत्री एस जयशंकर आजपासून तीन दिवस केनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत-केनिया संयुक्त आयोगाची तीसरी बैठक होणार आहे. त्या बैठकीचे ते अध्यक्ष राहणार आहेत. यावेळी ते दोन्ही देशातील विविध मुद्दावर चर्चा करणार आहेत.

  • आज GST परिषदेची महत्वाची बैठक -
    केंद्रिय अर्थमंत्री सीतारमण

केंद्रिय अर्थमंत्री सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची महत्वाची बैठक आज होणार आहे. यामध्ये कोविड व म्युकरमायकोसिसच्या औषधावरील करांमध्ये कमी करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजेकरणार अभिवादन -

खासदार छत्रपती संभाजीराजे

कोपर्डीची श्रध्दा व औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आज जाणार आहेत. ते सकाळी १० वाजता पुणे येथून निघणार आहेत. कोपर्डी येथे श्रध्दा यांना अभिवादन करून काकासाहेब शिंदे यांना औरंगाबाद येथे अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details