आज (26 मे) यास चक्रीवादळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या राज्यांना धडकेल. यास वादळाचा सर्वाधिक परिणाम अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, या राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
2021 या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण आज, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी २६ मे रोजी दुपारी ३-१५ ते सायं. ६-२३ या वेळेत होणार आहे. ते आपल्याला दिसणार नाही. मात्र या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने सुपरमूनचे दर्शन संपूर्ण भारतातून होणार असल्याचे खगोल अभ्यासकांचे मत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. 6 महिने होऊनही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 मे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. या दिवशी देशभरात आंदोलनं होणार आहेत. याला बसपा, काँग्रेससह देशातील 12 विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुद्ध पौर्णिमेला आभासी जागतिक समारंभात संबोधित करणार आहेत.
टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील प्रसिद्ध व्यक्तीरेखा साकारणाऱ्या जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशींचा आज वाढदिवस आहे. ही मालिका मिळण्यापूर्वी वर्षभर ते रिकामे होते. अभिनेते दिलीप जोशी यांनी सलमान खान सोबत ‘मैंने प्यार किया’ सोबतच ‘हम आपके है कौन’मध्येही काम केलं आहे. दिलीप जोशी यांना प्रसिद्धी मात्र ‘जेठालाल’ या भूमिकेनं मिळवून दिली.
अभिनेते दिलीप जोशींचा वाढदिवस