महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज मुंबईत कोरोनाचे 2662 नवे रुग्ण; 78 रुग्णांचा मृत्यू

आज मुंबईत 2662 नवे रुग्ण आढळून आले असून 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 5746 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांच्या प्रमाणात डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

todays corona patient numbers in mumbai
आज मुंबईत कोरोनाचे 2662 नवे रुग्ण; 78 रुग्णांचा मृत्यू

By

Published : May 3, 2021, 9:13 PM IST

मुंबई -गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होताना दिसत आहे. आज सोमवारी 2662 नवे रुग्ण आढळून आले असून 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 5746 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांच्या प्रमाणात डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 111 दिवस -

मुंबईत आज 2 हजार 662 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 58 हजार 866 वर पोहचला आहे. आज 78 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 13 हजार 408 वर पोहचला आहे. 5 हजार 746 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 89 हजार 619 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 54 हजार 143 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 111 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 93 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 814 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 23 हजार 542 तर आतापर्यंत एकूण 55 लाख 13 हजार 783 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट -

मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या -
गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938, 9 एप्रिलला 9200, 10 एप्रिलला 9327, 11 एप्रिलला 9989, 12 एप्रिलला 6905, 13 एप्रिलला 7898, 14 एप्रिलला 9925, 15 एप्रिलला 8217, 16 एप्रिलला 8839, 17 एप्रिलला 8834, 18 एप्रिलला 8479, 19 एप्रिलला 7381, 20 एप्रिलला 7214, 21 एप्रिलला 7684, 22 एप्रिलला 7410, 23 एप्रिलला 7221, 24 एप्रिलला 5888, 25 एप्रिलला 5542, 26 एप्रिलला 3876, 27 एप्रिलला 4014, 28 एप्रिलला 4966, 29 एप्रिलला 4192, 30 एप्रिलला 3925, 1 मे ला 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा- ऑक्सिजनच्या तुटवड्याने दिल्लीमधील रुग्णांची दमछाक...न्यायालयाची केजरीवाल सरकारला नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details