मुंबई -मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यांपासून पुन्हा रुग्ण संख्या आटोक्यात आली. मात्र, आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरला रुग्णसंख्या 409पर्यंत खाली आली होती. तर गेल्या आठवडाभरात त्यात दुप्पटीहून अधिक वाढ झाली. दरम्यान, आज मुंबईत 1074 रुग्ण आढळून आले असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी -
मुंबईत आज (शुक्रवारी) कोरोनाचे 1074 नवे रुग्ण आढळून आले असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 80 हजार 811वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 756वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 313 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 54 हजार 465वर गेला आहे. सध्या मुंबईत 12 हजार 588 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 195 दिवसांवर -