महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबई विमानतळाला स्व.बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने मंजूर केला आहे - एकनाथ शिंदे - politics in mahrashtra

todays-big-breaking-news
todays-big-breaking-news

By

Published : Jun 10, 2021, 7:01 AM IST

Updated : Jun 10, 2021, 7:13 PM IST

19:07 June 10

मुंबई -आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांच्या बैठकीतील सविस्तर माहिती दिली असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच नवी मुंबई विमानतळाला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने मंजूर केला असल्याचेही ते म्हणाले. 

15:37 June 10

मुंबई - सीबीआयने अनिल देशमुखांविरोधात दाखल केलल्या गुन्ह्यातील काही भाग वगळण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची तसेच यात प्रतिवादी बनवण्याची मागणी मूळ तक्रारदार डॉ. जयश्री पाटील यांनी केली होती. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. 

15:20 June 10

पुणे -  एनडीआरएफची 12 पथके अतिवृष्टीची शक्यता असणाऱ्या ठिकाणी रवाना झाली. जी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि रायगड जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहेत. अतिवृष्टीने कोणती आपत्तीजनक स्थिती निर्माण झाल्यास हे जवान बचावकार्य पार पाडणार आहेत. एनडीआरएफचे असिस्टंट कमांडन्ट पवन गौर यांनी ही माहिती दिली.

13:22 June 10

संपूर्ण राज्यात आज मान्सून दाखल - आयएमडी

मान्सूनच्या पावसाने आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

13:13 June 10

मुख्यमंत्र्यांना भेटायला केंद्राची परवानगी लागणार का? -राकेश टिकैत

मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे, अफगानिस्तानच्या राष्ट्रध्याक्ष्यांना नाही जे की मला भारत सरकारची परवानगी घ्यावी लागेल. देशातील एका मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आता काय व्हिसा घ्यावा लागणार का?  असा सवाल शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या भेटीवर केला आहे.

12:28 June 10

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सत्तेचा कार्यकाळ पूर्ण करेल- शरद पवार

राज्यात महाविकास आघाडीच्या नेतृत्वात स्थापन झालेले सरकार सत्तेचा कार्यकाळ पूर्ण करेल. त्याच बरोबर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकाही एकत्रपणे लढेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत आयोजित राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापण दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. तसेच शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष असल्याचेही पवार यावेळी म्हणाले. 

12:03 June 10

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकत्र बैठक झाली; पण त्याची चिंता करू नका- पवार

12:00 June 10

नागपूर काटोलमधील एलपीजी सिलिंडर लिक झाल्याने भीषण आग; तीन घरे भक्षस्थानी

नागपूर-  एलपीजी सिलिंडरमधील गॅस लिक होऊन लागलेल्या आगीने तीन घरे जळून खाक. जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे गावात आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे येथे आज सकाळी 6 च्या सुमारास राधाबाई टूले यांच्या घरातील एलपीजी गॅस सिलेंडर लिक झाल्याने त्यांच्या घरी आग लागली.  

पाहता पाहता आग शेजारी राहणाऱ्या विठाबाई टुले, कुमुद नारायण सरोदे यांच्या घरापर्यंत पोहोचली. या आगीत तिन्ही घरं आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दुर्दैवाने एका विठाबाई टुले या महिला शेतकऱ्याने खरीप हंगामासाठी बियाणे व खत घेण्याकरिता जमा केलेले 50 हजारपण जळून खाक झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत 10 लाखांचा नुकसान झाले आहे. हा घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

11:59 June 10

आरोग्य खाते सांभाळणाऱ्या राजेश टोपेंचे पवारांनी केले कौतुक

11:57 June 10

देशात अनेक पक्ष आले आणि गेले - शरद पवार

राष्ट्रवादीचा आज २२ वा वर्धापन दिन मुंबईत साजरा केला जात आहे. कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी केलेल्या प्रयत्नामुळे आज आपण २२ वा वर्धापण दिन साजरा करत असल्याचे शरद पवार म्हणाले.

10:24 June 10

ज्यांच्याकडे इंटरनेट नाही त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार - राहुल गांधी

कोरोना लसीकरणासाठी केवळ नोंदणी उपयोगाची नाही. तर लसीकरण केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाला लस मिळायला हवी. कारण जीवन जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, असा टोला राहुल गांधी यांनी भाजपा सरकारला लगवला आहे. 

10:21 June 10

पुण्यातुन एनडीआरएफची 12 पथकं अतिवृष्टीची शक्यता असणाऱ्या ठिकाणी रवाना

राज्य सरकारने कोकण किनार पट्टी भागात संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे एनडीआरएफ पथके तैनात करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज पुण्यातून एनडीआरएफची १२ पथके कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांकडे रवाना झाली आहेत.  

10:19 June 10

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन मुंबईतील पक्ष कार्यालयात साजरा

10:15 June 10

भारतात बुधवारी आढळले कोरोनाचे नवीन ९४ हजार ५२ बाधित रुग्ण

भारतात बुधवारी आढळले कोरोनाचे नवीन ९४ हजार ५२ बाधित रुग्ण. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 कोटी 91 लाख 83 हजार 121 इतकी झाली आहे. तर बुधवारी कोरोनामुळे तब्बल 6,148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांसह एकूण मृतांचा आकडा हा  3 लाख 59 हजार 676 वर पोहोचला आहे. बुधवारी देशात एकूण 1,51,367 जणांना कोरोनातून बरे झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

09:16 June 10

छत्तीसगडमध्ये एकाच कुटुंबातील पाच मुलींसह आईची रेल्वेखाली आत्महत्या?

छत्तीसगडमधील महासमुंद येथील शंकर नगर रेल्वे फाटका जवळ रेल्वेखाली चिरडून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका महिलेसह ५ मुलींचा समावेश आहे. ही सर्व जण बेचमा येथील एकाच कुटुंबातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांकडून दिली जात आहे. मृत महिलेचे नाव उमा साहू(३८) तर अन्नपूर्णा साहू, भूमी साहू, कुमकुम, स्वजा साहू, तुलसी साहू अशी त्या ५ मृत मुलींची नावे आहेत.

कौटुंबिक वादातून बुधवारी रात्री ती महिला आपल्या पाच मुलींना घेऊन घराबाहेर पडली होती. त्यानंतर आज रेल्वे रुळावर त्यांचे मृतदेह आढळून आले. या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

09:10 June 10

अमेरिकेने उठवले टिकटॉक वरील निर्बंध

अमेरिका प्रशासनाने चीनचे लोकप्रीय अॅप टिकटॉक आणि  चाट WeChat वर घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळात ही बंदी घालण्यात आली होती. याचबरोबर याच या अॅपसंबंधित राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

09:06 June 10

कोकण किनारपट्टी भागाला अतिवृष्टीचा इशारा

कोकण किनार पट्टीवर ढगांची दाटी किंचित कमी दिसत असून, आज दिवसा पावसाची तिव्रता थोडी कमी असण्याची शक्यता. संध्याकाळी नंतर किंवा उध्या पहाटे पासुन परत जोरदार पावसाला  सुरुवात होण्याची शक्यता. कोकण पुढचे ४,५ दिवस इशारे कायम -आएमडी 

गेल्या २४ तासात मुंबई २३१.३ मीमी पावसाची नोंद, नागरिकांनी काळजी घेण्याचे हवामान विभागाकडून आवाहन

09:00 June 10

भारतात बुधवारी २० लाख ४ हजार ६९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या

07:37 June 10

आज २०२१ या वर्षातील पहिले सूर्यग्रहण

आज या वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. भारतात मोजक्याच ठिकाणी हे गृहण पाहता येणार आहे. सूर्यग्रहण दुपारी  1:42 वाजता सुरू होणार आहे. तर सायंकाळी 6:41 वाजता समाप्त होईल. हे ग्रहण भारतात अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि और पाक व्याप्त काश्मिरमध्ये दिसणार आहे.

07:14 June 10

हैदराबादच्या नेहरू प्राणीसंग्रहालयातील एक हत्ती आणि बिबट्याचा वृद्धापकाळाने मृत्यू

 हैदराबादमधील नेहरू प्राणी संग्रहालयातील आशियाई मादी हत्ती राणीचा (८३ वय) तर अयप्पा नावाच्या २१ वर्षीय बिबट्याचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. प्राणीसंग्रहालय प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली 

07:10 June 10

कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा; राज्य सरकारने केंद्राकडे केली एनडीआरएफच्या पथकांची मागणी

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पूर परिस्थितीसह अन्य दुर्घटनांचे संभाव्य धोके लक्षात घेऊन राज्य सरकारने केंद्राकडे १२ एनडीआरएफ टीम देण्याची विनंती केली आहे. या १२ टीम किनारपट्टी भागातील जिल्ह्यात तैनात करण्यात याव्यात असे ही राज्य सरकारने केंद्राला सूचित केले आहे. 

07:00 June 10

कानपूर आग्रा महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार १२ जखमी

06:20 June 10

मालाड दुर्घटनेत १५ जणांना सुखरुप वाचवण्यात यश, तीन इमारती केल्या रिकाम्या

मुंबईतील मालाड मालवणीमध्ये बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास इमारतीचा भाग दुसऱ्या घरावर कोसळला . या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत १५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप बचाव कार्य सुरूच असून ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Jun 10, 2021, 7:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details