महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमच्या मुलांची लस विदेशात का पाठविली? - भाई जगताप - undefined

big breaking
बिग ब्रेकिंग

By

Published : May 29, 2021, 6:50 AM IST

Updated : May 29, 2021, 1:00 PM IST

11:38 May 29

मुंबई -आमच्या मुलांची लस विदेशी का पाठवली? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे. यासाठी अनेक महिला आणि काँग्रेस कार्यकर्ते यांनी महालक्ष्मी चौकात आंदोलन केले. भारतीयांना लसीसाठी वाट पाहावी लागत आहे. मोफत लस मिळणे त्यांचा अधिकार आहे. 11 वाजेपर्यंत आम्ही हे आंदोलन करत आहोत. जर नियम मोडला असेल तर अटक व्हायला तयार असल्याचेही भाई जगताप म्हणाले. 

10:42 May 29

मुंबई - पेट्रोल 100.19 रुपये, डिझेल 92.17 रुपये

10:40 May 29

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची प्रकृती गंभीर आहे. ते सध्या ऑक्सिजनवर आहेत, अशी माहिती लखनऊच्या मेदांता रुग्णालय प्रशासनाने दिली. तर 9 मेला आझम खान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

10:04 May 29

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने योगगुरू रामदेव यांना चर्चेसाठी आव्हान दिले आहे. कोणत्या अ‍ॅलोपॅथी रुग्णालयांनी उपचारासाठी पंतजली औषधी दिली आहेत, असे आयएमएने विचारले आहे. तसेच या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असेही आयएमएने म्हटले आहे. 

09:45 May 29

देशात मागील 24 तासांत 1 लाख 73 हजार 921 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 617 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर यासोबतच मागील 24 तासांत 2 लाख 84 हजार 601 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

09:41 May 29

कोल्हापूर - पेट्रोल 100.14 रुपये, डिझेल - 90.40 रुपये

जळगाव - पेट्रोल 101.41 रुपये, डिझेल 91.93 रुपये (जळगावात आज पेट्रोलच्या दरामध्ये 25 तर डिझेलच्या दरामध्ये 29 पैशांनी वाढ झाली)

09:37 May 29

नागपुरातील शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या दोन हुक्का पार्लर वर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

09:37 May 29

मुंबई -आर्थिक वादावरून एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी माहीम पोलिसांनी एका 27 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे.

09:12 May 29

नाशिक - पेट्रोल 100.57 रुपये, डिझेल 91.12 रुपये

परभणी - पेट्रोल 102.82 रुपये, डिझेल 93.33 रुपये

नागपूर - पेट्रोल 100.32 रुपये, डिझेल - 90.67 रुपये

08:57 May 29

अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन धर्मातील लोक जे गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, हरयाणा आणि पंजाबमध्ये राहत असतील, जे अल्पसंख्यांक समुदायातील असतील त्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करावा, अशी नोटीस केंद्रीय गृहमंत्रालयाने काढली आहे. 

07:54 May 29

राज्यात अनेक ठिकाणी इंधनाचे दर वाढतच आहेत. 

भंडारा - पेट्रोल - 104.13 रुपये, डिझेल - 94.53 रुपये  

पुणे - पेट्रोल 103.55 रुपये, डिझेल - 90.44

07:37 May 29

पुण्यातील खडकवासला येथे राष्ट्रीय सुरक्षा अकादमीच्या (एनडीए) 140व्या दीक्षांत समारंभाला सुरुवात. 

07:05 May 29

काल पहाटे मुंबईतील गोरेगाव भागातील रहिवासी भागात बिबट्या आढळून आला.  

06:28 May 29

ठाणे - उल्हासनगर येथील साई सिद्धी या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. यात ७ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. तर 3 ते 4 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (२८ मे) रात्री 9 वाजताच्या सुमारास उल्हासनगर येथील नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोरील साई सिद्धी या इमारतीचा स्लॅब कोसळला. 

Last Updated : May 29, 2021, 1:00 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details