मुंबई - अस म्हणतात की, हजार शब्दांच्या एका लेखापेक्षा एका व्यंगचित्राची ताकद जास्त असते. कारण, व्यंगचित्राच्या माध्यमातून एखाद्या विषयावर, एखाद्या घटनेवर मार्मिक भाष्य करता येते. आज जगभर जागतिक व्यंगचित्र दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुकवरुन व्यंगचित्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. व्यंगचित्रकारांच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की, एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
जगभरात व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकारांना मानाचे स्थान आहे. भारतीय समाजावरही व्यंगचित्राचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण ही दोन नावे त्यासाठी पुरेसी आहेत. ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. समाजाच्या दैनंदिन घडामोडीतील, जीवनातील विविधपदर तटस्थपणे उलगडून दाखविण्याचे काम व्यंगचित्रकार करीत असतो. कधी हास्य तर कधी गंभीरता धारण केलेले व्यंगचित्र समाजजीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्यामुळेच व्यंगचित्रांना 'समाजाचा आरसा' म्हटले जाते. शब्दबंबाळ नसलेली, वाचकांच्या मनातील मूर्त-अमूर्त कल्पनांना साकारणारी व्यंगचित्रे रसिकांच्या लवकर पसंतीस उतरतात.
सत्ताधाऱ्यांवर फटकारे
राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख असले तरी ते एक उत्तम व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांची व्यंगचित्रे ही वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांनी सातत्याने आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर फटकारे ओढले आहेत. महागाई, नोटाबंदी, इंधनदरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न, सध्याची राजकीय स्थिती, शिवसेना भाजप युती या सर्व मुद्यांवर राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मार्मिक भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे. व्यंगचित्र हे संवादाचं प्रभावी माध्यम आहे. राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
विचार करण्यास प्रवृत्त करणे