नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १०० जुडयांप्रमाणे मुळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे गवारच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले आहेत. रोजच्या जेवणाच्या ताटातली आवडीची भाजी महागडी नसावी असे सर्वांना वाटते. त्याचा परिणाम रोजच्या जेवणावर होतो. भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक घरातला भाजीपाला. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत. जाणून घेऊ या.
फळभाज्या : काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३४००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३९०० रुपये ते ४४०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००रुपये आहे.