महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Today Vegetables Rate: ताटातून लिंबू गायब! ऐन उन्हाळ्यात लिंबाचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर - भाज्यांचे दर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोप्रमाणे पावटा व वांग्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. लिंबू, घेवडा, कारली व वाटण्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर

By

Published : Mar 28, 2023, 6:52 AM IST

नवी मुंबई:जेवणाच्या ताटात विशेषत: मांसाहार करणाऱ्या व्यक्तींच्या ताटातच हमखास लिंबू असतो. पण लिंबाचे दर वाढत असल्याने लिंबू खरेदी करताना अनेकांना आखडता हात घ्यावा लागत आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे आहेत. कोबीचे प्रति १०० किलो प्रमाणे, ६०० रुपये ते ७०० रुपये दर आहे. कोहळा हा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपयावर आहे, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० रुपये ते ४४०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे, ३२०० रुपये ते ३४०० रुपये आहे. लाल टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे, १५०० रुपये ते १६०० रुपये इतका दर आहे. लाल टोमॅटो नंबर दोन प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये इतकी किंमत आहे.

भेंडी काकडी कारली दर: नंबर एकची भेंडी प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये तर नंबर दोनची भेंडी प्रति १०० किलो, ३५०० रुपये ते ४००० रुपये आहे. लिंबूची किंमत हि प्रति १०० किलो ७००० रुपये ते ९००० रुपये फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये आहे. फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ८००० ते १०००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये आहेत.नंबर दोनची काकडी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये आहे. ताजी कारले प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये आहेत.

वाटाणा वांगी मिरचे दर: तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ७००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ४६०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये आहेत १०० किलो प्रमाणे मिरची ज्वाला प्रति ४५०० रुपये ते ५००० रुपयावर आहे. लवंगी मिरचे दर प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये आहेत.

पालेभाज्या :कोथिंबीरचे नाशिकमध्ये प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १६०० रुपये दर, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये दर, कांदापात नाशिकात प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १२०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, आहे. तसेच पालकाचे दर हे पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपय पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये आहेत.

हेही वाचा: Today Vegetables Rate आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एपीएमसी मार्केटमध्ये वाढले या भाज्यांचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details