नवी मुंबई:आज नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात २५०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ६००० रुपये ते ८००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ४५०० रुपये ते ५००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ७५०० ते १०००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये आहे.
भाज्यांचे दर: काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ५००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३४०० रुपये आहे.