महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये आवक जास्त झाल्याने भाज्यांचे दर झाले कमी

गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक घरातला भाजीपाला. रोजच्या जेवणाच्या ताटातली आवडीची भाजी महागडी नसावी असे सर्वांना वाटते. भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत. जाणून घेऊ या.

apmc
एपीएमसी मार्केट

By

Published : Feb 11, 2023, 7:52 AM IST

नवी मुंबई: एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक जास्त झाल्याने भाज्यांचे दर कमी झाले आहेत.नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती१०० किलोंप्रमाणे फळभाज्या व १०० जुड्याप्रमाणे पालेभाज्या ३०० ते ४०० रुपयांनी कमी झाले आहेत, भाज्यांची आवक जास्त झल्याने दर कोसळले असल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात आले आहेत. १०० जुड्यां प्रमाणे मुळ्याच्या दरात मात्र ४०० रुपयांची वाढ झाली आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये आवक जास्त झाल्याने भाज्यांचे दर झाले कमी



भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये,

फळभाज्यांचे दर : काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये आहे.

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे :टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे, ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५२०० रुपये ते ५५०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४६००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये आहे.



पालेभाज्यांचे दर :कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १२०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये आहे.

हेही वाचा :Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये भेंडी, शेवगा घेवडा, तोंडली व मिरचीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

ABOUT THE AUTHOR

...view details