महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Top 10 @ 11 PM : रात्री अकरापर्यंतच्या ठळक बातम्या - दहावी निकाल

राज्य, देश आणि विदेशातील रात्री अकरापर्यंतच्या ठळक बातम्या...

today top ten news at 11 PM
Top 10 @ 11 PM : रात्री अकरापर्यंतच्या ठळक बातम्या

By

Published : Jul 29, 2020, 8:58 AM IST

Updated : Jul 29, 2020, 10:59 PM IST

  • मुंबई - कोरोना साथीचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असला तरी राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण ५९.८४ टक्के एवढे झाले आहे. आज देखील ७४७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३९ हजार ७५५ झाली आहे.

सविस्तर वाचा :राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आजचा आकडा 9 हजार पार, बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर

  • नवी दिल्ली :केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक-३ची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कन्टेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर भागांमधील निर्बंध शिथील करण्यावर सरकारने भर दिला आहे. एक ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय सुरू असेल आणि काय बंद; पाहूयात...

सविस्तर वाचा :अनलॉक-३ ची नियमावली जाहीर; पाहा काय सुरू आणि काय बंद..

  • मुंबई- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने मुंबईला हॉटस्पॉट बनवले आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग असलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाखांवर पोहचली आहे.

सविस्तर वाचा :मुंबईत कोविड चाचण्यांनी ओलांडला ५ लाखांचा टप्पा

  • नांदेड- नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेता आशुतोष भाकरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. भाकरे हे 'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुख यांचे पती आहेत.

सविस्तर वाचा :अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरेची आत्महत्या

  • नवी दिल्ली - पाच मध्यम मल्टी-रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एमएमआरसीए) च्या पहिल्या तुकडीतील राफेल जेट विमाने आज अंबाला एअरबेसवर दाखल झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. त्यांनी “पक्षी भारतीय आकाशात दाखल झाले आहेत… हॅपी लँडिंग इन अंबाला! ” अशा शब्दांत ट्वीटच्या मालिकेने या विमानांचे स्वागत केले आहे.

सविस्तर वाचा :'राफेल विमानांनी हवाई दलाच्या सामर्थ्यात अगदी योग्य वेळी वाढ केली'

  • नवी दिल्ली - केंद्रिय कॅबिनेटच्या बैठकीत आज(बुधवार) राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ला मंजूरी मिळाली. या धोरणानुसार 2035 पर्यंत उच्च शिक्षणात 50 टक्के विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 21 व्या शतकातील राष्ट्रीय शिक्षण धोरण मंजूर करण्यात आल्याचे केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.

सविस्तर वाचा :नव्या शैक्षणिक धोरणाला कॅबिनेटची मंजुरी; उच्च शिक्षणात मोठ्या सुधारणा

  • पुणे - सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दि. २१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२० या गणेशोत्सव काळामध्ये होणारा ३२ वा पुणे फेस्टिवल रद्द करण्यात आला आहे. प्रथेप्रमाणे पुणे फेस्टिवल श्रींची प्रतिष्ठापना व श्रींचे विसर्जन विधिवत करून संपन्न होईल, अशी माहिती पुणे फेस्टिवलचे चेअरमन सुरेश कलमाडी यांनी पत्रकाद्वारे दिली.

सविस्तर वाचा :31 वर्ष सातत्याने होत असलेल्या पुणे फेस्टिवलला ब्रेक, कारण...

  • चंदीगड : देशाच्या वायुसेनेची ताकद आज आणखी वाढली आहे. कारण वायुसेनेच्या ताफ्यात आज पाच नवी राफेल विमाने दाखल झाली आहेत. हरियाणाच्या अंबाला एअरबेसवर या विमानांचे काही वेळापूर्वी लँडिंग झाले.

सविस्तर वाचा :हवाई सेनेची ताकद वाढली; पाच महाशक्तीशाली 'राफेल' देशात दाखल!

  • हैदराबाद : बुधवारी पाच राफेल लढाऊ विमाने अंबाला भारतीय हवाई दलाच्या तळावर उतरणार आहेत. या विमानांमध्ये पाच विमाने ही ३ जणांना बसण्यासाठी आहेत तर २ विमानांत दोघे बसू शकतात. पाहूयात राफेल आणि इतर लढाऊ विमानांची माहिती..

सविस्तर वाचा :घातक राफेल आणि इतर भारतीय लढाऊ विमाने.. वाचा या विमानांची वैशिष्ट्ये

  • मुंबई -जग, देश आणि राज्य कोरोनाच्या संकटात असताना राज्यात वाघांच्या संख्येत यंदाही चांगली वाढ झाल्याचं व्याघ्रगणनेतून पुढे आलंय. 2014 साली राज्यात 190 वाघ होते. ते वाढून आता 312 झाले आहेत. ही वाढ जवळपास 65% आहे. देशातील एकूण वाघांची संख्या 2 हजार 967 झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात वाघांचे मानवावर हल्ले वाढले असले तरीही स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. त्यातूनच‌ जागतिक व्याघ्र दिन महाराष्ट्राची मान उंचावत असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा :जागतिक व्याघ्र दिन: वाघांच्या संख्या वाढीत महाराष्ट्र अव्वल, वर्षभरात 65 टक्क्यांची वाढ

Last Updated : Jul 29, 2020, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details