मुंबई- राज्यातील कोरोनाच्या रुग्णांनी दोन लाखांचा आकडा पार केला आहे. या आकडेवारीचा विचार करता, राज्यातील एकूण रूग्णसंख्येपैकी 62 टक्के रूग्ण हे पुरुष असून 38 टक्के महिला रूग्ण आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) आकडेवारीनुसार 7 जुलैपर्यंत राज्यात 2 लाख 11 हजार 145 रूग्ण कोरोनाबाधित झाले असून यातील 1 लाख 30 हजार 104 रूग्ण हे पुरुष आहेत. तर 81 हजार 41 महिला रूग्ण आहेत. तर, मृतांमध्ये 65 टक्के पुरुष असून 35 टक्के महिलांचा समावेश आहे. या माहितीवरून पुरुष कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
वाचा सविस्तर - राज्यातील पुरुष रुग्ण ठरत आहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी...
मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊनच आणि लाखो विद्यार्थ्यांचा हितासाठी आम्ही अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आम्ही ठाम आहोत. आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताची चिंता करतो. परंतु, बुधवारी विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी करून या परीक्षा घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर होण्यासाठी मी तातडीने पत्र लिहून आमची भूमिका स्पष्ट केली असून त्यावर यूजीसीकडून काय उत्तर येते? याची वाट पाहू, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
वाचा सविस्तर - अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यावर ठाम, तरीही यूजीसीच्या निर्णयाची वाट पाहू - उदय सामंत
लखनऊ - आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला कुख्यात गुंड विकास दुबेला उज्जैन शहरातील महाकाल मंदिरातून ताब्यात घेण्यात आले आहे. कानपूरला पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर विकास दुबे साथीदारांसह फरार झाला होता. आठ दिवसानंतर तो पोलिसांना सापडला आहे. मात्र, ही अटक होती की आत्मसमर्पण? योगी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे.
वाचा सविस्तर - विकास दुबेला अटक की आत्मसमर्पण? खुलासा करा; अखिलेश यादव यांची सरकारकडे मागणी
मुंबई - ठाण्यातील एका जिवंत रुग्णाचे नाव दुसऱ्याला देऊन त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला होता. हा प्रकार कुटुंबीयांना उघडकीस आणला. त्यानंतर आज संबंधित कुटुंबीय आणि भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास राज्यपालांनी समर्थन दिल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.
वाचा सविस्तर - ठाणे मृतदेह प्रकरण : भाजप नेत्यांसह पीडित कुटुंबीयांनी राज्यपालांची घेतली भेट
नाशिक - उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड विकास दुबे याने अवैधरित्या शस्त्रे विकल्याचा तसेच सशस्त्र सुरक्षारक्षक देण्याचा ठेका घेतल्याच्या संशयावरून नाशिक शहरातील सातपूर परिसरातील भंगार बाजारात विशेष झडती सत्र राबविल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, अशी कोणतीही कारवाई झाली नसून पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याचे सातपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वाचा सविस्तर - कुख्यात गुंड विकास दुबेचे नाशकात लागेबांधे? भंगार बाजारात झडतीसत्र राबवल्याच्या चर्चांना उधाण