मुंबई - मिशन बिगीन अगेनप्रमाणे मुंबईत आजपासून काही प्रमाणात दुकाने आणि बाजारपेठा उघडल्या आहेत. जवळजवळ अडीच महिन्यानंतर मुंबईत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने खुली झाली आहे. मुंबईतील महत्वाचा मानला जाणारा दादरमधील रानडे रोड परिसर थोडा का होईना परत लोकडाऊनपूर्व परिस्थितीकडे वाटचाल करताना दिसला.
'मिशन बिगीन अगेन'प्रमाणे मुंबईत आजपासून काही प्रमाणात बाजारपेठा खुल्या... - मुंबईत बाजारपेठ खुल्या
मिशन बिगीन अगेनप्रमाणे मुंबईत आजपासून काही प्रमाणात दुकाने आणि बाजारपेठा उघडल्या आहेत. जवळजवळ अडीच महिन्यानंतर मुंबईत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने खुली झाली आहे.
दादरमध्ये आज सकाळी लॉकडाउनवरील निर्बंध कमी केल्यामुळे अनेक दुकानदार बाजारपेठाकडे जाताना दिसले. तसेच ग्राहकसुद्धा काही प्रमाणात खरेदीसाठी रस्त्यावर उतरलेले दिसले. कपडे, बेडशीट, पडदे, किचनवेअर, मिठाई इत्यादी वस्तू विकणारी दुकाने सकाळी 9 वाजता उघडली. टेलरिंग दुकाने व डिपार्टमेंट स्टोअर्सही उघडली आहेत. परंतू, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या नियमानुसार लोकडाऊनच्या दोन महिन्यांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर ऑड इव्हन ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आलटून पालटून एक दिवसाआड दुकाने सुरू झाली.