महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदी-शाह जोडगोळी देशाला घातक, हे लोक पुन्हा राजकीय क्षितीजावर दिसता कामा नये - राज ठाकरे - bjp

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्करवर जाहीर पार पडली. यावेळी राज यांनी मोदीमुक्त भारताचे नवीन वर्ष जावो, असे म्हणत शुभेच्छा दिल्या. तसेच मोदी-शाह ही जोडी देशाला घातक असल्याचे राज म्हणाले.

शिवाजी पार्कवर धडाडणार राज ठाकरेंची 'तोफ'

By

Published : Apr 6, 2019, 4:45 PM IST

Updated : Apr 6, 2019, 11:46 PM IST

मुंबई - मोदी-शाह जोडगोळी देशाला घातक आहे. हे लोक पुन्हा राजकीय क्षितीजावर दिसता कामा नये, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. काळजावरती दगड ठेवून भाजपविरोधी मतदान करा, फायदा कोणाला व्हायचा तो होऊ द्या. निवडणुकीच्या तोंडावर भाजपवाले पैसे वाटालया आले तर पैसे घ्या. आजपर्यंत त्यांनी आपल्याला लुटले आहे, आता तुम्हा त्यांना लुटा असेही, राज म्हणाले.

मोदीमुक्त भारताचे नवीन वर्ष जावो असे म्हणत राज ठाकरेंनी आज मोदी सरकारवर निशाणा साधला. जगात आपल्या पंतप्रधानांची ओळख फेकू असल्याचे म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली. तसेच मला कोणीताही पक्ष वापरुन घेऊ शकत नाही असेही ते म्हणाले. पंतप्रधानांची जगातली ओळख फेकू आहे.

ज्यांनी पक्ष सत्तेपर्यंत पोहोचवला त्यांनांच केले बाजूला

लालकृष्ण अडवाणींनी पक्ष सत्तेपर्यंत आणला, पण त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. त्यांना सोयीस्करपणे बाजूला सारण्यात आले असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. भाजपने काँग्रेसच्या योजनांची नावे बदलली आहेत. जे सत्तेत येतील ते आपल्याच माणसांची नावे देत आहेत. काँग्रेसला पण नेहरु, गांधी अशीच नावे देणे गरजेचे आहे का ? दुसरी माणसे जन्माला आली नाहीत का? असा सवालही त्यांनी केला. आधार कार्डबद्दल मोदींनी वेगवेगळी विधाने केली आहेत. आधार कार्ड दिले तर देशातील लोक देशात घुसतील असे मोदी म्हणाले होते.

डिजीटल इंडीयाचा नुसता डांगोरा


डिजीटल इंडीया या योजनेचा मोदी सरकारने नुसता डांगोरा केला आहे. अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे गाव पहिले डिजीटल करण्याचे मोदींनी घोषीत केले होते. मात्र, तिथे जाऊन बघितले तर तिथली आवस्था खुप भयानक आहे. तेथे आणखी काहीही विकास झाला नाही. तेथे मोबाईलला आणखीही रेंज नसल्याचे राज म्हणाले.

मोदींसारखा थापा मारणारा पंतप्रधान मी आजपर्यंत बघितला नाही

30 वर्षानंतर काँग्रेसव्यतिरीक्त एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले असतानादेखील मोदींनी देशाची वाट लावली. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी बदलले. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत.५ वर्षात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांच्यासारखा थापा मारणारा पंतप्रधान मी आजपर्यंत बघितला नसल्याचे राज म्हणाले. नोटाबंदीनंतर साडेचार कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. प्रचंड प्रमाणात बेकारी वाढली असल्याचे राज म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्करवर जाहीर सभा होत आहे. मनसेने लोकसभा निवडणुका लढवणार नसल्याचे यापुर्वीच जाहीर केले आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपविरोधी प्रचार करण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांनी दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये ७ ते ८ जाहीर सभा घेणार आहेत. 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. मात्र, त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन यापूर्वीच केले आहे.

Last Updated : Apr 6, 2019, 11:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details