मुंबई : शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो. या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवली जाते. सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल केला जातो. महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते.
आजचे पेट्रोल डिझेलचे दर : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा 94 रुपये 27 पैसे आहे. पुण्यात पेट्रोलच्या दरात घसरण झाली आहे. डिझेलच्या दरात 29 पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल 105 रुपये 85 पैसे तर डिझेलचे दर 92 रुपये 37 पैसे आहेत. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलच्या दरात 50 पैशांची घसरण झाली आहे. पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे आहे. नाशिकमध्ये डिझेलच्या दरात 8 पैशांची घसरण झाली आहे. पेट्रोलचा दर 106 रुपये 72 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 19 पैसे. यवतमाळ शहरात पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. पेट्रोलच्या दरात 43 पैशांची घसरण झाली आहे. तर डिझेलच्या दरात 1 रूपयाची घसरण घासी आहे. आज पेट्रोलचे दर 107 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 59 पैसे आहे. नवीन योजना लागू झाल्यानंतर जून 2017 पासून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर हे काहीशा प्रमाणात जास्त आसतात. काल शुक्रवारी ( दि. 28 ) रोजी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा 94 रुपये 27 पैसे होता. पुणे शहरात पेट्रोलचा दर 106 रुपये 38 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 89 पैसे होता. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 63 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे होता. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 51 पैसे होता, तर डिझेल 93 रुपये 27 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 98 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 46 पैसे होता. नवीन योजना लागू झाल्यानंतर जून 2017 पासून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर हे काहीशा प्रमाणात जास्त आसतात.