मुंबई - आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र लोकल ट्रेन आणि इतर गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663, 17 फेब्रुवारीला 4787, 18 फेब्रुवारीला 5427 तर आज 6112 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसात रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
हेही वाचा -चंद्रकांत पाटील म्हणतात, नरेंद्र मोदींमुळे अब्दुल कलामांना राष्ट्रपती पदाची संधी
6112 नवीन रुग्ण -
आज राज्यात 6112 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 87 हजार 632 वर पोहचला आहे. तर आज 44 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 713 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.32 टक्के तर मृत्यूदर 2.48 टक्के आहे. राज्यात आज 2159 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 89 हजार 963 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 55 लाख 88 हजार 324 नमुन्यांपैकी 20 लाख 87 हजार 632 नमुने म्हणजेच 13.39 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 087 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 44 हजार 765 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण संख्या वाढली -